Gold Rate Today: सोन्या-चांदीचा भाव हा प्रत्येक शहरानुसार बदलत असतो. पण मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचे दिसून येते. 24 कॅरेट सोन्याचा भाव अंदाजे 57,000 रुपयांवर आला आहे. तर एक किलो चांदीची किंमत 71,000 रुपये आहे.
सोनं किंवा चांदीच्या किमतीवर अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो. त्यात सोनं हा अत्यंत मौल्यवान धातू असल्याने त्याला सर्वत्र मोठी मागणी असते. जगभरातील सोन्याच्या किमती आणि त्यासाठी होत असलेली मागणी हे सुद्धा सोन्याचा भाव कमी-जास्त होण्यामागे अनेक कारणांपैकी एक कारण आहे.
या आठवड्यातील दोन-तीन दिवसांचे सोन्याचे भाव पाहिले असता त्यामध्ये किंचित स्वरुपात सोनं स्वस्त झाल्याचं दिसून येतं. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीची किंमत कमी झाल्याचे दिसून येते. यामुळे भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 57 हजारांच्या आसपास आली आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 52,500 रुपयांवर आली. हे दर प्रत्येक शहरानुसारदेखील बदलतात.
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबईमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,370 रुपये असून, 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,590 रुपये आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,530 रुपये असून 22 कॅरेट सोन्यासाठी दिल्लीमध्ये 52,750 रुपये दर आकारला जात आहे. भारतातील महत्त्वाच्या शहरांचा विचार करता तमिळनाडूमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी सर्वाधिक 57,710 रुपये दर सुरू आहे. तर मुंबई, हैद्राबाद आणि भुबनेश्वरमध्ये सर्वांत कमी म्हणजे 57,370 रुपये दर सुरू आहे.
महाराष्ट्रात 24 कॅरेट सोनं 57,370
गोल्ड रेट डॉट कॉम या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे आणि शहरांमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,370 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,590 रुपये आहे. तर 1 किलो चांदीचा दर 70,700 रुपये आहे.