Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold Buying Options: सोन्यात गुंतवणूक करण्याचे बेस्ट पर्याय आणि प्रक्रिया जाणून घ्या

Gold Buying Options

Image Source : ww.microsmallcap.com

Gold Buying Options: सोनं हे आजही अनेक भारतीयांसाठी खात्रीचा गुंतवणुकीचा पर्याय आहे. सोनं हे चलनवाढीविरोधात काम करणारा महत्त्वाचा धातू असून याची जगभरात मान्यता आणि मागणी आहे.

Investment in Gold: सोनं हा भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. सोन्याचे दागिने हा महिलांसाठी तर खूपच हळवा विषय आहे. त्याचबरोबर सोन्याला भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व आहे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून भारतीयांसाठी सोनं हा आवडीचा गुंतवणूक प्रकार आहे.

सोनं या धातुचे मूल्य अलौकिक आहे. जगभरात याला मान्यता आहे. त्यात सोनं हे चलनवाढीविरोधात काम करणारा महत्त्वाचा धातू आहे. पण सोन्यातील गुंतवणूक म्हणजे सोन्याचे दागिने किंवा प्रत्यक्ष सोनं खरेदी करणं याचे खूप सारे तोटे देखील आहेत. सर्वप्रथम जे लोक गुंतवणूक म्हणून सोन्याचे दागिने खरेदी करतात. त्याला गुंतवणूक म्हटले जात नाही. कारण यामध्ये सोन्याची शुद्धता, दागिने बनवण्याचे मेकिंग चार्जेस, त्याची सुरक्षितता असे अनेक घटक कारणीभूत असतात. त्यात सोनं किंवा दागिने विकताना त्यात घट पकडली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष सोन्यातील गुंतवणुकीऐवजी सोन्याचे इतर गुंतवणुकीचे इतर पर्याय स्वीकारले पाहिजेत.

प्रत्यक्ष सोन्याऐवजी गुंतवणूकदारांनी डिजिटल सोन्यामध्ये (Digital Gold) गुंतवणूक केल्यास त्याचा जास्तीचा फायदा होऊ शकतो. यामध्ये प्रत्यक्ष सोन्याची किंवा दागिन्याची खरेदी करावी लागत नाही. त्यामुळे त्याच्या शुद्धतेचा मार्ग ही मोकळा होतो. याचबरोबर डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक केल्याचे आणखी कोणते फायदे आहेत. ते आपण जाणून घेणार आहोत.

सॉवरीन गोल्ड बॉण्ड (Sovereign Gold Bond)

केंद्र सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सॉवरीन गोल्ड बॉण्ड ही योजना सुरू केली. या योजनेत ग्राहकांना प्रत्यक्ष सोन्याऐवजी डिजिटल स्वरूपात सोनं मिळतं आणि ते डिमॅट अकाउंटमध्ये सुरक्षितरीत्या ठेवलं जातं. याची संपूर्ण जबाबदारी रिझर्व्ह बँक इंडियाची असते. तसेच यामधील गुंतवणुकीवर दरवर्षाला 2.5 टक्के व्याज दिले जते. यातून मिळालेल्या नफ्यावर कोणताही भांडवली कर आकारला जात नाह. त्यामुळेच सॉवरीन गोल्ड बॉण्डमधील गुंतवणूक ही किफायतशीर आणि सुरक्षित मानली जाते.

गोल्ड म्युच्युअल फंड (Gold Mutual Fund)

गोल्ड म्युच्युअल फंड हा आणखी एक सोन्यात गुंतवणूक करण्याचा डिजिटल पर्याय आहे. गोल्ड फंडमध्ये होणारी गुंतवणूक ही थेट सोन्यात होत नसली तरी, ती सोन्याच्या खाण कंपन्या आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये होते. यामध्ये किमान रकमेपासून आणि सिस्टेमॅटिक गुंतवणूक पद्धतीने  गुंतवणूक करता येते. हा पर्यायही सुरक्षिततेच्यादृष्टीने योग्य आहे. यासाठी डिमॅट अकाउंटची गरज पडत नाही.

गोल्ड ईटीएफ (Gold ETF)

गोल्ड ईटीएफ हा एक सोने खरेदीचा डिजिटल पर्याय आहे. गोल्ड ईटीएफची खरेदी-विक्री नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (National Stock Exchange-NSE & Bombay Stock Exchange-BSE) केली जाते. ईटीएफच्या गुंतवणुकीसाठी डीमॅट खात्याची गरज लागते. यामध्ये किमान 1 ग्रॅम युनिटपासून खरेदी करता येते. 2023 पासून गोल्ड ईटीएफमधील गुंतवणुकीवर सरकारने टॅक्स लागू केला आहे. 3 वर्षांच्या आतील गुंतवणुकीवर अल्पकालीन भांडवल टॅक्स (Short-Term Capital Gains-STCG) लागू होतो. तर 3 वर्षांवरील गुंतवणुकीवर दीर्घकालीन भांडवल टॅक्स (Long-Term Capital Gains-LTCG) लागू होतो. LTCG मध्ये गुंतवणूकदाराला कर सवलत मिळत नाही.

शुद्ध सोने, सोन्याचे दागिने, गोल्ड म्युच्युअल फंड, गोल्ड ईटीएफ आणि सॉवरीन गोल्ड बॉण्ड या प्रत्येक पर्यायाचे कमी-जास्त प्रमाणात फायदे-तोटे आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपले उद्दिष्ट आणि गरज लक्षात घेऊन यात गुंतवणूक केली पाहिजे.