Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BCCI Women IPL : महिलांच्या आयपीएल टीमची मालकी कुणाला मिळणार?  

Women's IPL

Image Source : www.businesstoday.in

BCCI Women IPL : आयपीएल स्पर्धा देशातल्या स्पोर्ट्स कॅलेंडरमध्ये महत्त्वाचा ब्रँड बनली आहे. आणि पुरुषांच्या यशस्वी लीगनंतर आता महिलांसाठी लीग सुरू करण्याचं बीसीसीआयने ठरवलंय. आणि फ्रँचाईजींच्या मालकीसाठी आता निविदाही काढल्यात

पुरुषांची आयपीएल (IPL) स्पर्धा यशस्वी केल्यानंतर आता बीसीसीआयने (BCCI) महिला क्रिकेट टी-20 (WIPL) ला सुरुवात केली आहे. आणि मार्च 2023 मध्ये स्पर्धेचा पहिला हंगाम सुरू होणार आहे. आणि महिला टीम फ्रँचाईजीचे (IPL Franchise) हक्कं आणि ही फ्रँचाईजी चालवण्यासाठी बीसीसीआयने निविदाही मागवल्या आहेत. महिलांची आयपीएल 3 ते 26 मार्च दरम्यान भरवण्यात येणार आहे.    

‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ वुमेन्स इंडियन प्रिमिअर लीगच्या संघ मालकी आणि व्यवस्थापनासाठी निविदा आजपासून सुरू करत आहे,’ असं बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. निविदा भरण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी आहे. अर्ज करताना कंपन्यांना नियमाप्रमाणे Invitation to Tender (ITT) विकत घ्यावं लागेल. आणि त्याचं शुल्क 5,00,000 रुपये बीसीसीआयला भरावे लागतील. हे पैसे परत मिळणार नाहीत.    

अलीकडेच बीसीसीआयने महिला आयपीएलच्या टीव्ही प्रसारणाचे हक्क विकण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. आता टीमची मालकी ठरली की, खेळाडूंचा लिलाव होऊन महिला टीम तयार होतील. 2009 मध्ये आयपीएलचा पहिला हंगाम पार पडला होता. त्यानंतर 2023 मध्ये महिलांसाठी आयपीएल स्पर्धा भरवण्यात येत आहे.   

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात बीसीसीआयने महिलांसाठी पुरुषांप्रमाणेच टी-20 भरवण्याची घोषणा केली होती. भारतीय महिला टीमने 2017 च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपद पटकावलं. आणि 2020च्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही महिला टीमने फायनल पर्यंत मजल मारली. त्यानंतर महिला क्रिकेटकडेही रसिक आणि मार्केटिंग कंपन्यांचं लक्ष गेलं आहे.    

त्यानंतर महिला क्रिकेटमध्ये स्मृती मंढाना, शेफाली शर्मा तसंच हरमनप्रीत कौर असे स्टारही यातून जन्माला आले. अलीकडेच नोव्हेंबर 2022 मध्ये बीसीसीआयने महिला क्रिकेटर आणि पुरुष क्रिकेटर यांच्या मॅच फीमध्येही समानता आणली आहे. आता महिलांच्या आयपीएलविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे.