BCCI's revenue from IPL increased by 30 percent: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून बीसीसीआय अर्थात बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट हे ओळखले जाते. या बोर्डामार्फत अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातात, तसेच आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीग हे क्रिडासत्रही खेळवले जाते. या आयपीलएलच्या सामान्यांमधील स्पॉन्सरशीप आणि मिडिया राईट्समधीन एकूण 4 हजार 69.5 एवढे रुपये कमावले. ही टुर्नामेंट इतिहासातील सर्वात मोठी कमाई आहे. मागील चौदा वर्षांत बीसीसीआयला कोणत्याच टुर्नामेंटमधून एवढी कमाई झाली नव्हती. येत्या 10 वर्षांमध्ये बीसीसीआयचा आयपीएलद्वारे येणारा महसूल 12 हजार 715 कोटींच्या घरात जाणार आहे, असे बीसीसीआयने सांगितले आहे.
बीसीसीआयला कशाद्वारे पैसे मिळाले ? How did BCCI get money?
बीसीसीआयने यावर्षी स्पॉन्सशीपच्या रक्कमेत बदल केले आहेत, नवीन स्पॉन्सर जोडले आहेत, तसेच प्रक्षेपणाच्या राईट्स मध्ये बदल केले आहेत. हे सर्व बदल म्हणजे महसूल वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न होते. 2022 च्या आयपीएल टुर्नामेंटमध्ये एकूण 15 स्पॉन्सर होते, मागील वर्षापेक्षा यंदा 6 स्पॉन्सर अधिक आहेत. भारत सरकारची ऑनलाइन पेमेंट सेवा प्रणाली रुपे आणि फूड डिलिव्हरी अॅप स्विगी इन्स्टामार्ट यांनी बोर्डासोबत मोठा करार केला आहे. याअंतर्गत रुपेकडून 42 कोटी रुपये आणि स्विगीकडून 44 कोटी रुपये बीसीसीआयच्या खिशात पडतील, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले आहे.
यंदाच्या वर्षात 10 टीमने मिळून एकूण 74 सामने खेळले. या सर्व मॅचेसचे बीसीसीआय़ला 3 हजार 269.5 कोटी रुपये मिळाले आहेत. तर स्पॉन्सरशिपमधून 800 कोटी मिळाले हे दोन्ही मिळून बोर्डाने 4 हजार 69.5 एवढी रक्कम कमावली. मागील वर्षाच्या तुलनेत ही कमाई 30 टक्क्यांनी वाढली आहे. येत्या काळात हा महसूल अधिका वाढणार आहे. डिजिटल आणि इतर मिडिया राईट्सचे हक्क बदलण्यात आले आहेत, आणखी टीम्स सामील केल्या जाणार आहेत, तसेच आणखी स्पॉन्सरही वाढवण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयसह सर्वच टीम आयपीएलद्वारे मोठी कमाई करतात. प्रत्येक टीमला कमीत कमी 6 कोटी ते जास्तीत जास्त 40 कोटींपर्यंत स्पॉन्सरशीप मिळते. एवढी मोठी स्पॉन्सरशिप किंवा कंपन्या यात पैसे टाकण्याचे कारण म्हणजे ऐरवी हे सर्व खेळाडुंना जाहिराती किंवा एंडॉर्समेंट म्हणून घेतले तर खूप रक्कम मोजावी लागते तसेच त्यांचे इतर खर्चही असतात. मात्र या स्पॉन्सरशिपद्वारे लहान मोठ्या जाहिराती टिव्ही, डिजिटलसाठी सहज बनवता येतात, फोटोशूट करून घेता येते. हे सर्व कमी किंमतीत होत असल्यामुळे अनेक लहान मोठ्या कंपन्या टीमसाठी स्पॉन्सर म्हणून उभ्या राहतात.