Bandhan Bank FD Rate: देशातील खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये गणल्या जाणार्या बंधन बँकेने(Bandhan Bank) पुन्हा 2 कोटी रुपयांपासून ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या बल्क एफडीवरील(Bulk FD) व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने 10 कोटी ते 25 कोटी रुपये, 25 ते 50 कोटी रुपये आणि 50 कोटी रुपयांच्या वरच्या एफडीवरील व्याजदरातही(Interest) वाढ केली आहे. हे नवीन दर 30 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.
Bandhan Bank चा नवीन व्याजदर किती?
बंधन बँक(Bandhan Bank) बल्क एफडीवर सर्वाधिक 7.90 टक्के व्याज देत आहे. हे व्याज 365 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर दिले जात आहे. बंधन बँक ग्राहकांना 5 टक्के ते कमाल 7.90 टक्के व्याज देत आहे. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीची ऑफर देत आहे.
FD च्या दिवसानुसार व्याजदर खालीलप्रमाणे
- 7 ते 15 दिवसांचे नवीन दर - 5 टक्के
- 16 ते 28 दिवस - 5.80 टक्के
- 29 ते 45 दिवस - 5.80 टक्के
- 46 ते 90 दिवस - 5.80 टक्के
- 91 ते 180 दिवस - 6.25 टक्के
- 181 ते 364 दिवस - 6.75 टक्के
- 365 दिवस - 7.90 टक्के
- 366 दिवस - 7.90 टक्के
- 367 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी - 7.90 टक्के
- 15 महिने ते 2 वर्षांपेक्षा कमी - 6.15 टक्के
- 2 वर्षे ते 3 वर्षे - 6.15 टक्के
- 3 वर्षे ते 5 वर्षे - 6.15 टक्के
- 5 वर्षे ते 10 वर्षे - 5.00 टक्के