Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple चा ग्राहकांना झटका, iPhone ची बॅटरी बदलणे महागात पडणार

iPhone

Image Source : www.tomsguide.com

Iphone : Apple ने ग्राहकांना झटका दिला आहे. iPhone ची बॅटरी बदलणे महागात पडणार आहे. आता मार्चपासून, ग्राहकांना आयफोनची बॅटरी बदलण्यासाठी अतिरिक्त 20 डॉलर म्हणजेच सुमारे 2 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. AppleCare+ ग्राहकांना बॅटरी रीप्लेसमेंट मिळते. मात्र, Apple आयफोन बॅटरी वॉरंटी अंतर्गत कव्हर होत नाही.

AppleCare+ ग्राहकांना बॅटरी रीप्लेसमेंट मिळते. मात्र, Apple आयफोन बॅटरी वॉरंटी अंतर्गत कव्हर होत नाही.  आता  मार्चपासून, ग्राहकांना आयफोनची बॅटरी बदलण्यासाठी अतिरिक्त  20 डॉलर म्हणजेच सुमारे 2 हजार  रुपये खर्च करावे लागणार आहेत.  

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अॅपलने लाखो ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. जर तुम्ही देखील आयफोन युजर असाल आणि तुमच्या आयफोनची बॅटरी खराब झाली असेल तर तुम्हाला नवीन वर्षात बॅटरी बदलण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. Apple ने बॅटरी बदलण्याची प्रोसेस अपडेट केली आहे.  त्यानंतर नवीन किंमती मार्चपासून लागू होणार आहेत. 

आयफोनची बॅटरी वॉरंटीमध्ये नाही

AppleCare+ सदस्यांना बॅटरी रीप्लेसमेंट मिळते. मात्र, Apple आयफोन बॅटरी वॉरंटी अंतर्गत कव्हर होत नाही. आता मार्चपासून ग्राहकांना आयफोनची बॅटरी बदलण्यासाठी अतिरिक्त  20 डॉलर म्हणजेच सुमारे 2 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. नवीन बॅटरी बदलण्याची पद्धत 1 मार्चपासून सुरू होईल. सध्या iPhone 13, iPhone 12, iPhone 11 आणि iPhone X ची बॅटरी बदलण्यासाठी 69 डॉलर  म्हणजेच सुमारे 6 हजार रुपये खर्च करावे लागतील. परंतु 1 मार्चपासून त्याची किंमत 89 डॉलर म्हणजेच सुमारे 7 हजार 385 रुपये होईल. iPhone SE, iPhone 8 आणि इतर जुन्या मॉडेल्ससाठी बॅटरीची किंमत 49 डॉलर म्हणजेच सुमारे 4 हजार रुपये आहे. आयफोन 14 सीरीजची बॅटरी बदलण्याची सुविधा सध्या 99 डॉलरमध्ये म्हणजेच सुमारे 8 हजार रुपये आहे.

नवीन फोन Apple A17 चीपसह 

आयफोन 15 सीरीज नवीन वर्षात लॉन्च होणार आहे. iPhone 15 सिरिज A17 Bionic चिपसेटसह सादर केली जाणार आहे.   हा चिपसेट A16 बायोनिक चिपसेटपेक्षा 35 टक्के वेगवान असेल. iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max A16 सह लॉन्च केले गेले आहेत. इतर दोन मॉडेल्स A15 सोबत सादर करण्यात आले आहेत.

Apple बॅटरी क्षमतेविषयी 

Apple त्यांच्या कोणत्याही उत्पादनांच्या बॅटरीबद्दल अधिकृतपणे तांत्रिक माहिती देत नाही. परंतु काही बेंचमार्क रिपोर्ट्सनुसार, iPhone 14 मध्ये 3279mAh, iPhone 14 Plus मध्ये 4325mAh बॅटरी आहे आणि iPhone 14 Pro मध्ये 3200mAh आणि iPhone 14 Pro Max मध्ये 4323mAh बॅटरी आहे.