रिलायन्स समुहाचे (Reliance Group) अध्यक्ष अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या व्यावसायिक आणि खाजगी (Professional & Personal Life) आयुष्यातही 2022 वर्षांत खूप घडामोडी घडल्या आहेत. रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल उद्योगाची भरभराट त्यांनी यावर्षी पाहिली. रिलायन्स तिमाही निकाल जाहीर करताना आपल्या तीन मुलांमध्ये संपत्ती आणि रिलायन्स समुहाची मालकी यांचंही समसमान वाटप त्यांनी केलं.
त्याचबरोबर खाजगी आयुष्यात त्यांची कन्या ईशा अंबानीला (Isha Ambani) जुळी मुलं झाली. तर धाकटा मुलगा अनंत अंबानीचा (Anant Ambani) रोका सोहळा म्हणजेच साखरपुडाही यावर्षी पार पडला. अनंत अंबानीची आयुष्याची जोडीदार असणार आहे त्याची जुनी मैत्रीण आणि एनकोअर हेल्थकेअरची एक संचालक राधिका मर्चंट (Radhika Merchant). 2018 मध्ये सोशल मीडियावर पहिल्यांदा दोघांचे फोटो एकत्र झळकायला लागले आणि तिथून लोकांना या नवीन नात्याची कुणकुण लागली.
त्यानंतर एका वर्षभरात दोघांचा रोका सोहळाही पार पडला आहे. राधिका मर्चंट कोण आहे हे आपण या लिंकमध्ये पाहू शकता .
आता बघूया राधिका मर्चंटची एकूण संपत्ती किती आहे?
राधिका मर्चंटची एकूण संपत्ती किती?
राधिका मर्चंट न्यू यॉर्क विद्यापीठाची पदवीधर आहे. तर अनंत अंबानी यांनी ब्राऊन विद्यापीठातून पदवी घेतली आहे. राधिका ही एनकोअर हेल्थ केअरचे सीईओ विरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. तिला एक धाकटी बहीण आहे अंजली मर्चंट.
पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर राधिका मर्चंट एनकोअर हेल्थकेअरच्या संचालक मंडळात रुजू झाली आहे. आणि तिथे ती संचालक म्हणून दैनंदिन व्यवहार सांभाळते. द पर्सोनेज या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, तिला मिळणारा पगार बघता सध्या तिची एकूण संपत्ती 8 ते 10 कोटी रुपयांच्या घरात आहे. तिचे वडील विरेन मर्चंट यांची संपत्ती मात्र 755 कोटी रुपये इतकी आहे. आणि अर्थातच, यातली ती एक वारसदार आहे.
राधिकाला उद्योजकतेबरोबरच नृत्य आणि फॅशनचीही आवड आहे. 28 वर्षांच्या राधिकाने श्री निभा आर्ट्सच्या गुरू भावना ठाकर यांच्याकडून भरतनाट्यम् चं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं आहे. त्यासाठी तिचा अरंगेत्रम सोहळा अलीकडेच रिलायन्स जिओ सेंटरमध्ये पार पडला होता. आणि त्यासाठी तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक हजेरी लावली होती.
अनंत अंबानींकडे आलेला वारसा
वर म्हटल्याप्रमाणे अनंत अंबानी यांनीही रिलायन्स समुहात काम करायला सुरुवात केली. आहे. आणि गंमत म्हणजे तो राधिका पेक्षा एका वर्षाने लहान म्हणजे 27 वर्षांचा आहे. रिलायन्स समुहात नवीन ऊर्जा प्रकल्पांची जबाबदारी अनंत अंबानीवर सोपवण्यात आली आहे.
आणि त्याच्या नेतृत्वाखाली रिलायन्स समुह अपारंपरिक तसंच पर्यावरण पूरक ऊर्जास्त्रोतांच्या विकासावर काम करत आहे.