Mhada Lottery 2023: घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तुमचे हेच स्वप्न पुण्यात परवडणाऱ्या किमतीत साकार होऊ शकते, यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण(Mhada) कडून 5990 घराची लॉटरी काढण्यात आली आहे. यामधील 2908 घरांचे वाटप हे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर होणार आहे. असे असले तरीही अर्जदारांची संख्या कमी असल्याचे समोर आले आहे. नेमकं काय कारण आहे, चला तर जाणून घेऊयात.
2908 घरांचे वाटप हे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर
म्हाडाची(Mhada) स्थापना 1977 मध्ये मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात परवडणारी घरे(Affordable Home) उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली. महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2021-22 नुसार नोव्हेंबर 2021 पर्यंत 4,85,151 घरे पूर्ण झाली आहेत असे नोंदवण्यात आले आहे. म्हाडाच्या पुणे मंडळामार्फत ही सोडत 5 जानेवरीपासून सुरु झाली असून या सोडतीचा निकाल 17 फेब्रुवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. या लॉटरीमध्ये एकूण 5990 घराची लॉटरी काढण्यात आली आहे. यामधील 2908 घरांचे वाटप हे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर होणार असल्याचे देखील घोषित करण्यात आले होते.
अर्जदारांची संख्या तरीही कमीच का?
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (Mhada) सोडतीसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (FCF) या वर्गातील घरांसाठी अर्जासोबत भरायची अनामत रक्कम 50,000 रुपये करण्यात आली आहे. तर अन्य वर्गातील रक्कम 10,000 रुपयांवरून 15,000 रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे घरांसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या घटण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. यंदा अल्प आणि अत्यल्प गटांसाठीही अनामत रकमेत वाढ केली आहे.
घर न मिळालेल्या अर्जदारांना रक्कम दिली केली परत
सोडतीत घर न मिळालेल्या अर्जदारांना अर्जाचे शुल्क वजा करून रक्कम परत केली जाते. घराच्या आशेने मोठ्या संख्येने इच्छुक अर्जदार एक किंवा त्यापेक्षा अधिक अर्ज करत असतात, मात्र या प्रत्येक अर्जामागे अनामत रक्कम भरावी लागत आहे. मध्यस्थांवर रोख लावण्यासाठी अनामत रकमेत वाढ करण्यात आली असल्याचा दावा म्हाडाकडून(Mhada) करण्यात आला आहे. यामुळे सोडतीसाठी एक किंवा त्यापेक्षा अधिक अर्ज करणाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.