एअरटेल दूरसंचार कंपनीने (Bharti Airtel) आपली वर्ल्ड पास योजना सुरू केली आहे. हा पास तुमच्याकडे असेल तर 184 देशांमध्ये तुम्हाला डेटा, टॉकटाईम यासाठी वेगळा प्लान घ्यायची गरज पडणार नाही. याचा आणखी एक फायदा म्हणजे विमान प्रवासा दरम्यान तुम्ही एखाद्या ठिकाणी ट्रान्झिट (Transit) घेत असाल तरी तुमचा एअरटेल वर्ल्ड पास तुम्हाला टेनिफोन सुविधा आणि इंटरनेट सुविधा देऊ शकेल. थोडक्यात, आंतरराष्ट्रीय रोमिंगच्या सगळ्या गरजा या प्लानमध्ये पूर्ण होणार आहेत.
एअरटेल वर्ल्डपासची वैशिष्ट्ये Airtel World Pass Features
- 184 देशांमध्ये एकच टेलिकॉम प्लान लागू होईल. त्यामुळे तुम्ही प्रवास करत असलेला देश कुठल्या झोनमध्ये येतो, त्यासाठी कुठला प्लान निवडायचा हा प्रश्न उरणार नाही. ट्रान्झिटमध्येही टेलिकॉम सेवा सुरळीत सुरू राहील.
- याशिवाय प्लान धारकांसाठी 24 तास कस्टमर सपोर्ट सेवा सुरू राहील. आणि त्यासाठी कुठलाही अतिरिक्त आकार पडणार नाही. सेवेविषयी कुठलीही शंका असेल तर 99100-99100 या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन एअरटेल कंपनीनं केलं आहे. ही सेवा वॉट्सअॅपवरही उपलब्ध असेल.
- या प्लानची मुदत अगदी एक वर्षापर्यंत आहे. त्यामुळे वारंवार परदेश प्रवास करणाऱ्या किंवा एकावेळी मोठ्या मुदतीसाठी परदेशात राहू इच्छिणाऱ्या सगळ्यांसाठी हा प्लान सोयीचा आहे. शिवाय हा प्लान प्री-पेड आणि पोस्ट पेड ग्राहकांसाठीही उपलब्ध आहे. यात तुम्ही फोन/व्हीडिओ कॉल, इंटरनेट सर्फिंग तसंच संदेश पाठवू शकता
- या प्लानबरोबर एअरटेल थँक्स अॅप (Airtel Thanks) डाऊनलोड केलंत की, हा प्लान कसा वापरायचा याचं नियंत्रणही तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकाल. डेटाचा वापर, बिल तसंच अतिरिक्त डेटा, टॉकटाईम हवा असेल तर तो ही तुम्ही अॅपचा वापर करून घेऊ शकाल.
भारती एअरटेलच्या ग्राहक सेवेचे संचालक शाश्वत शर्मा यांना या प्लानच्या यशस्वितेची खात्री आहे. ‘आम्हाला ग्राहकांकडून आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवेसाठी जे फिडबॅक मिळाले, त्यातूनच वर्ल्ड पासची संकल्पना पुढे आली आहे. आणि असा प्लान आणणारी एअरटेल ही पहिली कंपनी असल्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय कंपनीने एक नवा पायंडा पाडला आहे,’ असं शर्मा यांनी कंपनीने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
वर्ल्ड पासमुळे वेगवेगळ्या देशांत तिथल्या स्थानिक सेवा घेण्याची गरज लोकांना पडणार नाही.