Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

AirAsia India launches sale: एअरएशिया इंडियाकडून विमान प्रवाशांना नववर्षाची भेट!

AirAsia India launches 'New Year, New Deals’ sale

AirAsia India launches 'New Year, New Deals’ sale: नवीन वर्षात स्वस्तात विमान प्रवास करता येणार आहे. विस्तारा, इंडिगो या विमानसेवा कंपन्यांपाठोपाठ एअरएशिया इंडिया या टाटा ग्रुपच्य कंपनीनेही नववर्षाची सवलत दिली आहे. नेमकी काय सवलत आहे, कधीपर्यंत आहे ते या बातमीतून जाणून घ्या.

AirAsia India recently announced its 'New Year, New Deals' sale: नववर्षाच्या (New Year) निमित्ताने सर्वत्र सेल, सलवत, सूट यांचा पाऊस पडत आहे. इंडिगोच्या विंटर सेल पाठोपाठ आता टाटा ग्रुपच्या एअर एशिया इंडियानेही न्यू इयर, न्यू डिल या नववर्षाच्या भेटीची घोषणा नुकतीच केली आहे. ही सवलत केवळ 15 जानेवारीनंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असणार आहे. या सवलतीमुळे, बंगलोर - कोची या प्रवासाची किेमत 1 हजार 497 पासून सुरू होत आहे.

नुकतेच एअरएशिया इंडियाने नववर्ष सवलतीची अधिकृत घोषणा कली. न्यू इयर, न्यू डिल अंतर्गत 15 जानेवारी ते 14 एप्रिल 2023 या चार महिन्यांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. यासाठी एअरएशिया इंडियाच्या www.airasia.co.in या अधिकृत वेबसाईटवर तसेच अधिकृत मोबाईल अॅप जाऊन नोंदणी करणे गरजेचे आहे. याचबरोबर इतर अधिकृत प्लॅटफॉर्म, एजन्सीद्वारेही नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत धारकांनाच ही सवलत या चार महिन्यांमध्ये लागू होणार आहे. यासह लॉयल्टी प्रोग्रॅम अंतर्गत नियूपास ( NeuPass) असलेल्या प्रवाशांना त्यांच्या बुकिंगमध्ये 8 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. या सवलतीसोबत पासधारकांना चेकइन करताना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांना मोफत फूड उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे नववर्षासाठी हा पास घेणेही प्रवाशांच्या फायद्याचे ठरणार आहे.

सध्या चीनमध्ये करोनाचा उद्रेक होत आहे, जागतिक आर्थिक स्थिती बिकट आहे. अशावेळी, सर्वप्रथम परिणाम हा विमान प्रवासावर, विमानसेवा व्यवसायावर होतो. त्यामुळे अनेक विमानसेवा कंपन्यांवी सवलती, सेल सुरू केले आहेत. मधल्या काळात झालेला तोटा भरून काढण्यासाठी आणि येत्या काळात निर्बंधांमुळे होणारा तोटा काही प्रमाणात कमी करण्यासाठी ही शक्कल लढवली जात आहे, असे एव्हिएशन वृत्तपत्रकार सिद्धार्थ एस. खांडकेकर यांनी सांगितले.

एअरएशिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही टाटा समुहाच्या एअर इंडिया लिमिटेडची उपकंपनी आहे. या कंपनीच्या विमानसेवेची सुरुवात 12 जून 2014 पासून भारतात झाली. या विमानसेवा कंपनीने देशभरात 50 थेट आणि 100 कनेक्टिंग मार्गांवर उड्डाण केले.

एक जानेवारीपासून एअरएशिया इंडिया आणि एअर इंडिया यांचे कमीत कमी किंमतीत विमान प्रवास हा एकत्रित प्रकल्प सुरू होणार आहे. या प्रकल्पाच्या अध्यक्षपदी एअऱ इंडिया एक्सप्रेसचे सीईओ आलोक सिंह यांची नियुक्त होणार आहे. तर, एअरएशियाचे सीईओ सुनिल भास्करन हे विमानचालन प्रशिक्षण अकादमीचे (aviation training academy) अध्यक्ष म्हणून कार्यरत होणार आहेत.