Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Year End Sale of Vistara Airlines; 2023 रुपयात मिळतंय विमानाचं तिकीट

Vistara Airline Year End Sale

Year End Sale of Vistara Airlines: प्रवाशांना 10जानेवारी 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंतचे विमानाचे तिकीट बुक करता येणार आहे.

Year End Sale of Vistara Airlines: देशातील सर्वात मोठ्या एअरलाईन असणाऱ्या इंडिगो(Indigo) आणि प्रीमियम विस्ताराने(Vistara) वर्षाच्या शेवटी 'Year End Sale' ची मोठी घोषणा केली आहे. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी तुम्ही जर दुसऱ्या शहरात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

कधीपासून सुरु होतोय 'Year End Sale'?

विस्तारा(Vistara) प्रवाशांसाठी नवीन वर्षात स्वस्त विमान प्रवासाची संधी देत ​​आहे. टाटा समूहाच्या(TATA) या विमान कंपनीची तीन दिवसांठी 'Year End Sale' ची विक्री सुरू झाली आहे. या माध्यमातून प्रवाशांना 29 डिसेंबरपर्यंत विमानाच्या तिकिटाचे बुकिंग करता येणार आहे. या सेलमध्ये 10 जानेवारी 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंतचे विमानाचे तिकीट बुक करता येणार आहे.

तिकीटासाठी किती मोजावे लागतील पैसे?

देशांतर्गत(Domestic) प्रवासासाठी एकेरी तिकिटाची किंमत केवळ 2023 रुपये ठेवण्यात आली असून आंतरराष्ट्रीय(International) परतीच्या तिकिटाची किंमत 13,699 रुपयांपासून असल्याचे पाहायला मिळत आहे.

विस्ताराचे एअर इंडियामध्ये होणार विलीनीकरण

देशामध्ये कोरोनाच्या लाटेनंतर विमान प्रवास बर्‍याच प्रमाणात परवडणारा झाला आहे. नवीन वर्षाची सुट्टी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक हल्ली विमानाने प्रवास करत आहेत. त्यामुळे देशातील अनेक विमानतळांवर प्रचंड गर्दी असल्याचे दिसून येत आहे. विस्तारा एअरलाईन(Vistara Airline) ही टाटा व सिंगापूर एअरलाईन्स(Singapore Airline) यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. या विस्तारा एअरलाईन्समध्ये टाटा समूहाचा 51 टक्के हिस्सा असून उर्वरित 49 टक्के हिस्सा सिंगापूर एअरलाईन्स (SIA) कडे आहे. अलीकडेच सिंगापूर एअरलाइन्सने विस्ताराचे टाटा समूहाच्या एअरलाईन कंपनी एअर इंडियामध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. या विलीनीकरण करारांतर्गत, SIA एअर इंडियामध्ये 2,058.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

काय होता इंडिगोचा 'Year End Sale'?

यापूर्वी इंडिगोनेही तीन दिवसांचा हिवाळी सेल जाहीर केला होता. या सेलमधील तिकिटाची किंमत 2023 रुपये ठेवण्यात आली होती. या एअरलाईन्सच्या तिकीटाची विक्री शुक्रवार, 23 ते 25 डिसेंबरपर्यंत चालली होती. या सेलमध्ये 15 जानेवारी 2023 ते 14 एप्रिल 2023 पर्यंतच्या प्रवासासाठी तिकीट खरेदी करण्याची सुविधा देण्यात आली होती.