Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rojgar Mela: देशातील 71 हजार युवकांना मिळाला रोजगार, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप

Rojgar Mela

Rojgar Mela: गेली काही वर्षे भारतात बेरोजगारी वाढते आहे. जागतिक मंदीचे सावट भारतावरही आता दिसू लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर युवा वर्गाला रोजगार मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. रोजगार मेळाव्यात तब्बल 71 हजार लोकांना जॉब ऑफर लेटर आज देण्यात आले आहे.

Government Job 2023:प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित रोजगार मेळाव्यात तब्बल 71 हजार लोकांना जॉब ऑफर लेटर आज देण्यात आले आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते या ऑफर लेटरचे वितरण केले गेले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील 45 ठिकाणी आयोजित रोजगार मेळाव्यांना पंतप्रधानांनी संबोधित केले.

गेली काही वर्षे भारतात बेरोजगारी वाढते आहे. जागतिक मंदीचे सावट भारतावरही आता दिसू लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर युवा वर्गाला रोजगार मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. येणाऱ्या काळात आणखी रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून अधिकाधिक युवकांना रोजगार दिला जाणार असल्याचे प्रधानमंत्र्यांनी म्हटले आहे.

विविध पदांसाठी दिले गेले ऑफर लेटर

देशभरात विविध ठिकाणी नोकर भरती करून युवावर्गाला रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. रेल्वे विभागाशी संबंधित ट्रेन मॅनेजर, स्टेशन2 मास्तर, तिकीट क्लर्क अशी पदे भरली गेली आहेत. तसेच पोलीस विभागात सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल अशा पदांवर काही उमेदवारांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. स्टेनोग्राफर, ज्युनिअर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट तसेच इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर ही पदे देखील भरली गेली आहेत.

त्याचसोबत सीनियर डॅटर्समन, असिस्टंट प्रोफेसर, शिक्षक, ग्रंथपाल, नर्स, प्रोबेशनरी ऑफिसर, पीए, एमटीएस आणि इतर जागांवर देखील बंपर भरती करण्यात आली आहे. नव्याने भरती झालेल्या या कर्मचाऱ्यांना येत्या काही महिन्यांत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड

गेल्या काही वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल बघायला मिळतो आहे असं प्रधानमंत्री मोदी म्हणाले. कृषी क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, वाहन बाजारपेठ दिवसेंदिवस विस्तारत चालली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असल्याचेही प्रधानमंत्री म्हणाले.


'स्टार्टअप इंडिया', 'कौशल विकास योजना' आणि 'मुद्रा' सारख्या योजना फायदेशीर ठरत असून मोठ्या संख्येने युवावर्ग सक्षम बनतो आहे असंही ते म्हणाले. स्टार्टअपमुळे 40 लाख परोजगार निर्माण झाल्याचेही निरीक्षण प्रधानमंत्र्यांनी नोंदवले. सध्याच्या काळात भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला