Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mumbai Metro: मुंबई मेट्रो मार्ग 2A आणि 7 मध्ये 30 टक्के महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग

Mumbai Metro

Image Source : www.msn.com

Mumbai Metro: नुकत्याच उद्घाटन झालेल्या मुंबई मेट्रो मार्ग 2A आणि 7 वर महिला कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दल जाणून घ्या.

Mumbai Metro: सध्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM. Narendra Modi) यांनी 19 जानेवारी रोजी नवीन मेट्रो मार्गांचे उद्घाटन केले. मेट्रो मार्ग 2A आणि 7 वर महिला कर्मचारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. यामध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांपैकी सुमारे 30 टक्के महिला कर्मचारी आहेत. तांत्रिकसह(Technical Department) अनेक विभागात महिलांनी पुढाकार घेऊन काम करायला सुरुवात केली आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

'या' विभागात सक्रियपणे काम करतात महिला

मुंबईकरांच्या सेवेत काही दिवसांपासून मुंबई मेट्रो मार्ग 2A आणि 7 हजर झाली आहे. विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे यामध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांपैकी सुमारे 30 टक्के महिला कर्मचारी आहेत. या मेट्रो लाईनच्या तांत्रिक विभागात(Technical Department) महिलांची विशेष टीम कार्यरत आहे. यामध्ये 305 कर्मचाऱ्यांपैकी 63 महिला आहेत. या महिला वेगवेगळ्या जवाबदाऱ्या मोठ्या हिमतीने पार पडत आहेत. जसे की, रोलिंग स्टॉकच्या तांत्रिक देखभालीची सर्व कामे पाहणे, मग ती प्राथमिक देखभाल असो, गीअर डिससेम्बलीची तपासणी आणि दुरुस्ती असो, पेंटाग्रामची(OHE) देखभाल असो किंवा लहान नट बोल्ट फिक्स करणे असो. या सर्व कामांमध्ये महिला सक्रियपणे सहभाग नोंदवताना पाहायला मिळत आहेत. याशिवाय नवीन मेट्रो चालवण्यासाठी जवळपास 91 लोक आहेत, त्यापैकी 21 महिला कर्मचारी आहेत. तिकीट विभाग आणि मेट्रो सिग्नलिंग विभागातील अनेक कर्मचारी या महिला आहेत.

1 लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला

पश्चिम उपनगरात होणाऱ्या ट्रॅफिकवर उपाय म्हणून मेट्रो लाईन 2A आणि 7 सुरू करण्यात आली आहे. मेट्रोच्या या दोन्ही लाईनवर एकूण 30 स्टेशन असणार आहेत. या दोन्ही लाईन्स सुरू झाल्यानंतर लिंक रोड(Link road) आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर(Western Express Highway) ट्रॅफिक कमी होण्यासाठी मदत झाली आहे. विशेष म्हणजे मेट्रो लाईन 2A आणि 7 ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चक्क पहिल्याच वीक एंडला 1 लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे.