Mumbai Metro: लवकरच मुंबईकरांच्या सेवेत मुंबई मेट्रो 2A आणि 7 उपस्थित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या( PM. Narendra Modi) हस्ते गुरुवारी(19 जानेवारी 2023) या मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. नुकतेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने(Mumbai Metro Rail Corporation) या मार्गांवरील तिकिटांचे दर(Ticket Rate) जाहीर केले असून या तिकिटांच्या किमती 10 रुपयांपासून ते 50 रुपयांच्या दरम्यान असणार आहेत. चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून तिकिटांचे दर जाहीर(Mumbai Metro Rail Corporation announces ticket prices)
पश्चिम उपनगरात होणाऱ्या ट्रॅफिकवर उपाय म्हणून मेट्रो लाईन 2A आणि 7 सुरू करण्यात येत आहे. या मेट्रो मार्गाचे संचालन महा मुंबई मेट्रो रेल ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिडेट(Maha Mumbai Metro Rail Operation Corporation Limited) करणार असून मुंबई मेट्रो लाईन - 2A दहिसरला डीएन नगरशी जोडणार असून मेट्रो लाईन 7 दहिसर ईस्टला अंधेरी ईस्टशी जोडली जाणार आहे. नुकतेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या मेट्रो मार्गांसाठीचे तिकिटांचे दर(Ticket Rate) जाहीर केले आहेत. या तिकिटांच्या किमती 10 रुपयांपासून ते 50 रुपयांच्या दरम्यान असणार आहेत. स्थानकामधील अंतरानुसार तिकिटांचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
किती रुपये तिकीट असेल?(How much will be the ticket?)
- 0 ते 3 किलो मीटर अंतरासाठी 10 रुपये तिकीट असेल
- 3 ते 12 किलो मीटर अंतरासाठी 20 रुपये तिकीट असेल
- 12 ते 18 किलो मीटर अंतरासाठी 30 रुपये तिकीट असेल
- 18 ते 24 किलो मीटर अंतरासाठी 40 रुपये तिकीट असेल
- 24 ते 30 किलो मीटर अंतरासाठी 50 रुपये तिकीट असेल
मेट्रो लाईन 2A ची स्थानके जाणून घ्या(Know Metro Line 2A stations)
मेट्रो लाईन 2A हा मार्ग दहिसर पश्चिम ते डीएन नगरपर्यंत(Dahisar West to DN Nagar) असणार आहे. याकरिता 6410 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या मार्गावर 17 स्थानके असणार आहे. अंधेरी पश्चिम, ओशिवारा, लोअर ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड पश्चिम, वनराई, डहाणूकरवाडी, कांदिवली पश्चिम, पहाडी एकसर, बोरिवली पश्चिम, खंडारपाडा, आनंदनगर, दहिसर पश्चिम, मांडपेश्वर या ठिकाणी स्थानके असणार आहेत.
मेट्रो लाईन 7 ची स्थानके जाणून घ्या(Know Metro Line 7 stations)
मेट्रो लाईन 7 चा मार्ग हा अंधेरी ते दहिसरपर्यंत(Andheri to Dahisar) असेल. या मेट्रो मार्गावर एकूण 13 स्थानके असणार आहे. जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाडा, नॅशनल पार्क, ओवरीपाडा इथे मेट्रो मार्ग थांबणार आहे. या मार्गासाठी एकूण 6208 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.