OBC STUDENTS: विधानसभेत ओबीसी(OBC) समाजातील विद्यार्थ्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी(DCM. Devendra Fadnavis) एक घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे यापुढे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सुविधांसाठी सरकारकडून मदत मिळणार आहे. नक्की काय आहे ही घोषणा जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.
ओबीसी विद्यार्थ्यांना सरकार करणार आर्थिक मदत
विधानसभेत ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी(DCM. Devendra Fadnavis) एक घोषणा करून आर्थिक मदत करण्याचे ठरवले आहे. वसतिगृहांमध्ये(Hostel) प्रवेश न मिळालेल्या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक सुविधांसाठी 21,600 रुपये वर्षाकाठी दिले जातील असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना देण्यात येणारी ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले. या शिवाय ओबीसी विद्यार्थी कल्याणाच्या इतरही योजना त्यांनी जाहीर केल्या आहेत.
काय आहे नक्की प्रस्ताव?
सत्ताधारी व विरोधकांच्या प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, अडीच वर्षांत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एकही वसतिगृह सुरू करण्यास महाविकास आघाडी सरकारला(MVA) वेळ मिळाला नव्हता मात्र आम्ही ते शक्य करून दाखवले. आम्ही राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये या योजनांचा प्रारंभ करणार आहोत. त्याकरिता जागा निश्चितही करण्यात आल्या आहेत. 5 वसतिगृहे लवकरच सुरू केली जाणार आहेत. ही वसतिगृहे एनजीओंना(NGO) चालवायला दिली जाणार आहेत. पीएचडी(PHD) करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सरसकट 35000 रुपयांचे अर्थसाहाय्य सरकार करणार आहे.