Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी नोंदणी कशी करायची, जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana

Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana: 10वी, 12वी, डिप्लोमा आणि प्रोफेशनल कोर्सेस स्टडीजसाठीआणि निवास, वसतिगृह आणि इतर सुविधांसारख्या खर्चासाठी महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक सहाय्य म्हणून प्रति वर्ष 51,000 रुपये दिले जातात.

Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana: राज्यातील अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध प्रवर्ग (NP) विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 10वी, 12वी, डिप्लोमा आणि प्रोफेशनल कोर्सेस स्टडीजसाठी ((10 th, 12th aur diploma and professional courses studies) आणि निवास, वसतिगृह आणि इतर सुविधांसारख्या खर्चासाठी महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक सहाय्य म्हणून प्रति वर्ष 51,000 रुपये दिले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र समाज कल्याण विभागामार्फत राबविली जाते.

पात्र असलेले मात्र वसतिगृह न मिळालेले देखील करू शकतात अर्ज

या योजनेंतर्गत इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये प्रवेश घेणारे सर्व विद्यार्थी आणि त्यानंतर व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारे सर्व अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गाचे विद्यार्थी व पात्र लाभार्थी देखील यासाठी पात्र असतील. असे लाभार्थी जे पात्र असून देखील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी त्यांना आवास, वसतिगृहात राहण्याची सोय आणि इतर खर्चासाठी ही मदत मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सुमारे 17 शासकीय वसतिगृहांमध्ये या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जात असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळेची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज कसा करावा?

  • या योजनेंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी खालील चरणांचे अनुसरण करावे. 
  • सर्वप्रथम अर्जदाराला महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत https://sjsa.maharashtra.gov.in/  या वेबसाईटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ आपल्या समोर उघडेल
  • होम पेजवर तुम्हाला स्वाधार योजना PDF  वर क्लिक करून तुम्हाला तेथून अर्ज डाउनलोड करावा लागेल
  • अर्ज डाउनलोड केल्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल
  • सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या सर्व कागदपत्रांची फोटो कॉपी अर्जासोबत जोडावी लागेल आणि ती तुमच्या संबंधित समाज कल्याण कार्यालयात देखील जमा करावी लागेल
  • अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. ओळखपत्र
  3. बँक खाते पुस्तक 
  4. आय प्रमाण पत्र
  5. जात प्रमाणपत्र
  6. मोबाईल नंबर
  7. पासपोर्ट आकाराचा फोटो