Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

500 आणि 2 हजारांच्या 1680 कोटी नोटा हिशोबातून गायब; RBIच्या अहवालातून स्पष्ट!

RBI Reports on Currency

2016 च्या नोटबंदीनंतर सरकारला किमान 3 ते 4 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा सरकारी दरबारी जमा होईल, अशी अपेक्षा होती. पण यात सरकारची घोर निराशा झाली. नोटबंदीनंतर आरबीआयकडे फक्त 1.3 लाख कोटी रुपये जमा झाले.

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या (RBI) 2016-17 ते 2021-22 या वर्षातील वार्षिक अहवालानुसार आरबीआयने 2016 पासून आतापर्यंत 500 आणि 2 हजार रुपयांच्या 6,849 कोटी नोटा छापल्या होत्या. त्यातील 1,680 कोटीपेक्षा अधिक नोटा या आरबीआयच्या हिशोबातून गायब आहेत आणि या गायब नोटांचे मूल्य 9.21 लाख कोटी रुपये इतकं आहे, असं दैनिक भास्करने म्हटलं आहे.

नवीन नोटांची डुब्लिकेट नोट त्याचवर्षी बाजारात दाखल!

ज्यावर्षी नवीन डिझाईनच्या नोटा आरबीआयकडून जारी करण्यात आल्या. त्याचवर्षी या नवीन नोटांच्या डुब्लिकेट नोटासुद्धा बाजारात दाखल झाल्या होत्या. 2016 मध्ये 2 हजाराच्या 638 आणि 500 रुपयांच्या 199 बनावट नोटा (Fake Currency) आरबीआयला सापडल्या होत्या. सरकारने 2016 मध्ये नोटबंदी 500 आणि 1 हजार रुपयाची नोट बंद केल्यानंतर गेल्या 6 वर्षात आरबीआयला नवीन 2 हजाराच्या 79,836 नोटा तर नवीन 500 रुपयांच्या 1.81 लाख बनावट नोट्या सापडल्या आहेत.


नोटबंदीनंतर सरकारला अपेक्षित होते की, यातून किमान 3 ते 4 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा सरकारी दरबारी जमा होईल. पण याबाबतीत सरकारची घोर निराशा झाली. यातून आरबीआयकडे फक्त 1.3 लाख कोटी रुपये जमा झाले. पण याचबरोबर त्यावेळी आलेल्या 500 आणि 2 हजार रुपयांच्या नवीन नोटांमधून 9.21 लाख कोटी रुपयांचा हिशोब लागत नाही.

RBI currency Annual Report

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया 2019-20 पासून 2 हजार रुपयांची नोट छापत नाही. पण 500 रुपयांच्या नोटांची छपाई 2016च्या तुलनेत 76 टक्क्यांनी वाढवली. याबाबत RBIने अद्याप या नोटा गायब होण्यामागचं कारण अजून जाहीर केलेलं नाही.


2 हजारांची नोट लोकांना पसंत नाही...

आरबीआयच्या 2021-22 च्या वार्षिक अहवालामध्ये एका सर्व्हेक्षणाचा उल्लेख केला आहे. त्या सर्व्हेक्षणानुसार 2 हजारांची नोट लोकांना पसंत नसल्याचे दिसून आले. पण RBIने यापूर्वीच म्हणजे 2019 पासूनच 2 हजारांची नोट छापणं बंद केलं.