वाढत्या महागाईमुळे नोटांची निर्मिती आणि छपाई खर्च ही वाढत आहे. आरटीआयच्या (Right to Information) माहितीवर आधारित बिझनेसलाईन वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार 200 रुपयांच्या नोटेचा खर्च 500 रूपयांच्या नोटेपेक्षा महाग असल्याचे दिसते. रिझर्व्ह बँकेने याबाबत माहिती देताना म्हटले आहे, की 10 रुपयांच्या नोटा छापण्यासाठी 20 रुपयांच्या नोटेपेक्षा जास्त खर्च येतो.
भारतामध्ये कोणतेही चलन लागू करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (Reserve Bank of India) आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली भारतात 4 नोट छपाई प्रेस आणि 1 पेपरमिल यांचा कार्यभार चालविला जातो. नोटा छापल्या जाणाऱ्या प्रेस देवास (मध्य प्रदेश), नाशिक (महाराष्ट्र), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि म्हैसूर (कर्नाटक) येथे आहेत. तर मुंबई, कोलकत्ता, हैदराबाद आणि नोएडा येथे नाणी तयार केली जातात.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) नोटा छापण्यासाठी रिझर्व सिस्टीम नियमांचे पालन करते. हा नियम 1956 मध्ये बनवण्यात आला होता. आरबीआय करन्सी नोट प्रिंटिंगच्या अगेंस्ट कमीतकमी 200 कोटी रूपये सुरक्षित जमा म्हणून ठेवाने लागतात. यातील 115 कोटी रुपये सोन्यात (Gold) आणि उरलेले 85 कोटी रूपये विदेशी चलनात ठेवावे लागतात.
सध्या भारतात 2000, 500, 200, 100, 50, 20, 10, 5, 2 आणि 1 रूपयांच्या नोटा चलनात आहे. या वेगवेगळ्या चलनाच्या नोटा छापण्यासाठी आरबीआयला वेगवेगळा खर्च येतो. 2 हजार रूपयांची एक नोट छापण्यासाठी साधारणत: 3.54 रूपये खर्च येतो. ही नोट भारतीय चलनातील सर्वांत मोठ्या किमतीची नोट आहे. जुनी 500 आणि 1 हजार रूपयांची नोट बंद केल्यानंतर आरबीआयने 2 हजार रूपयांची नोट चलनात आणली होती.
500 रूपयांची नोट एक छापण्यासाठी 2.94 रूपये खर्च येतो. नोटबंदीच्यावेळी आरबीआयने जुनी 500 रूपयांची नोट रद्द करून नवीन नोट चलनात आणली. या नोटेवर लाल किल्ल्याची प्रतिकृती छापण्यात आली आहे. तर 200 रूपयांची नोट छापण्यासाठी आरबीआयला 2.93 रूपये प्रति नोट खर्च येतो. या नोटेवर सांची येथील स्तूपाची प्रतिकृती छापण्यात आली.
आरबीआयला सध्या 10 रुपयांच्या एक हजार नोटा छापण्यासाठी 960 रुपये खर्च येतो. तर 20 रूपयांच्या नोटांसाठी 950 रुपये खर्च येतो. त्याचप्रमाणे 500 रुपयांच्या हजार नोटा छापण्यासाठी 2 हजार 290 रुपये खर्च येतो. 200 रूपयांच्या नोटांसाठी 2 हजार 370 रुपये खर्च येतो.100 रुपयांच्या 1 हजार नोटा छापण्यासाठी 1,770 रुपये खर्च येतो.
वर्षभरात महागाई वाढल्यामुळे नोटांच्या छपाई किमतीत ही वाढ झाली आहे. आरबीआयला 2020-21 मध्ये 50 रुपयांच्या नोटा छापण्यासाठी 920 रुपये खर्च आला होता. त्यात 2021-22 मध्ये 23 टक्क्यांनी वाढ झाली आणि त्याचा खर्च 1,130 रूपये झाला. 20 रुपयांच्या नोटांसाठी 940 रूपये खर्च येत होता, तो आता 950 रूपये झाला आहे.
image source - https://bit.ly/3nceC0e