Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

महाराष्ट्रातील 6 प्रकल्पांसाठी नगर विकास विभागाने दिली 1,304 कोटींच्या निधीस मंजुरी

Central Government

Image Source : www.deccanherald.com

Central Government: केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या महाराष्ट्रातील सहा प्रकल्पांसाठी नगर विकास विभागाने 1,304 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहिती समोर आली आहे.

Central Government: केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या महाराष्ट्रातील (Maharashtra) सहा प्रकल्पांसाठी नगर विकास विभागाने निधीची तरतूद केल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील सहा वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने 1,304 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामधील पहिल्या टप्प्यामध्ये 50 टक्के अर्थात 652 कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्याला मिळणार आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने एमएमआरडीए (MMRDA), सिडको (CIDCO), पीएमआरडीए (PMRDA) आणि प्रशासनांना 652 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीमुळॆ राज्यातील सहा प्रकल्पांना आता गती मिळणार आहे.

या निधी अंतर्गत कोणती कामे केली जातील?

  • राज्यातील या सहा प्रकल्पांमध्ये मुंबईतील (Mumbai) एमएमआरडीएच्या (MMRDA) शिवडी-वरळी उन्नत मार्ग (Shivdi-Worli Elevated Road), कुर्ला ते वाकोला उड्डाणपूल (Kurla to Vakola Flyover ) आणि बीकेसी ते एलबीएस उड्डाणपूल ( Bkc to Lbs Flyover) यांवरील उन्नत मार्गिका, तसेच बीकेसी ते वाकोला जंक्शन उन्नत मार्गिकेचा (BKC to Vakola Junction Elevated Line) समावेश करण्यात आला आहे 
  • पुणे विद्यापीठ चौकातील पीएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या मेट्रो रेल मार्गिकेसोबत (Metro Rail Route) एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी यामध्ये समाविष्ट आहे
  • सिडको अंतर्गत येणाऱ्या कोंढाणे प्रकल्प पाणी पुरवठा योजना आणि बाणगंगा प्रकल्प पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येईल 

कोणत्या प्रकल्पासाठी किती तरतूद?

एमएमआरडीए (MMRDA)

  • शिवडी वरळी उन्नत मार्गसाठी 250 कोटी रुपये देण्यात आले आहेत 
  • कुर्ला ते वाकोला उड्डाणपूल आणि बीकेसी ते एलबीएस उड्डाणपूल उन्नत मार्गासाठी 87,50,00000 रुपयांची तरतूद 
  • बीकेसी ते वाकोला जंक्शनसाठी 22,50,00000 रुपयांची तरतूद

पीएमआरडीए (PMRDA)

  • पुणे विद्यापीठ (University of Pune) चौकात मेट्रो रेल मार्गिकेसोबत एकात्मिक दुमजली उड्डाणपुलासाठी 37,50,००००० रुपयांची तरतूद

सिडको (CIDCO)

  • कोंढाणे प्रकल्प पाणी पुरवठा योजनेसाठी 125 कोटी रुपयांची तरतूद
  • बाणगंगा प्रकल्प पाणी पुरवठा योजनेसाठी 129,50,00000  रुपयांची तरतूद