Online Vegetables Selling: शेतकऱ्यांच्या मालाला व्यवस्थित भाव मिळत नसल्याने आता शेतकरी विचारात पडला आहे. त्यावर काही उपाय शोधत असतांना शेतकऱ्यांनी त्यावर एक तोडगा म्हणून ऑनलाइन भाजी विकण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन (Online) म्हणजे बाकी लोक विकतात त्याप्रमाणे नाहीत तर, सोशल मीडियाचा (Social media)वापर करून ग्राहकांचे ऑर्डर मिळवायचे आणि त्यांना भाजी पुरवायची. या संकल्पनेचा अवलंब कसा करायचा आणि ही आयडिया कोणाची हे जाणून घ्या.
प्रोड्यूसर्स कंपनी हा नवीन उपक्रम सुरू….. (Producers Company is a new venture...)
शेतकऱ्यांसाठी शासनाने विविध उपकरण राबविले आहेत, त्यापैकी एक म्हणजे प्रोड्यूसर्स कंपनी हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मध्यस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबवणे हा आहे. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी थेट महानगरातील ग्राहकांशी थेट संपर्क सुरू केला आहे. यासाठी समाज माध्यमांची खूप मदत होत आहे. व्हॉटस् अॅपवरील (WhatsApp app) विविध ग्रुप यासाठी, फेसबुकवरील (Facebook) विविध माध्यमातून देखील शेतकरी, विशेषतः युवा शेतकरी उत्पादक आपल्या शेती उत्पादनासाठी हक्काची बाजारपेठ मिळवू लागले आहेत. याच माध्यमातून आता शेतीमालाचाही ऑनलाईन मागणीवरून पुरवठा, विक्री करण्यास सुरवात करून शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे ऑनलाईन मार्केटिंग (Online Marketing) सुरू केले आहे.
प्रोड्यूसर्स कंपनीच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा….. (Through Producers Company you too….)
पुणे जिल्ह्यातील काही युवा शेतकऱ्यांनी एका कंपनीच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून असा उपक्रम सुरू केला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतःच्या वैयक्तिक कॉनटॅक्टमुळे सुद्धा हा उपक्रम पुढे नेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या वैयक्तिक कॉनटॅक्टमधून हा उपक्रम सुरू करू शकता, तुमच्या मोबाइलमधील फेसबुक, whats app च्या माध्यमातून ऑर्डर घेऊन मागणीला पुरवठा करून हा उपक्रम समोर नेऊ शकता. ताजा भाजीपाला आणि उत्कृष्ट सर्विस देऊन तुम्ही तुमचे नाव करून त्यातून पैसा कमावू शकता.