Christmas-New Year Trip: नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण कमी खर्चात सुंदर ट्रिपचा प्लॅन करित असाल, तर खास आपल्यासाठी भारतातील सुंदर पाच ठिकाणे घेऊन आलो आहोत. या ठिकाणी आपण कमी पैशात मस्त ट्रिप करू शकता.
Table of contents [Show]
जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir)
जम्मू-काश्मीर हे प्रत्येकाचे आवडते ठिकाण आहे. कारण काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग किंवा मिनी स्विर्झलॅंड म्हणून ओळखले जाते. येथे पांढरी चांढर ओढणारे नैसर्गिक सौंदर्य अतूलनीय आहे. बर्फीली पहाड, वाहणारे थंड गार पाणी, सफरचंदांच्या बागा या मनात घर करणाऱ्या आहेत.
गोवा (Goa)
गोवा प्रत्येक तरूणांसाठी असणारे खास पर्यटन स्थळ आहे. ख्रिसमसमध्ये गोव्याला जाणे म्हणजे आपल्या आनंदाला चार चाँद लागण्यासारखे आहे. सुंदर व आकर्षक बीच, वैभवशाली चर्च, नारळाची झाडे अशी एक ना एक गोष्टी गोव्यामध्ये पाहण्यासारख्या आहेत. मनोरंजनसाठी क्रूझ व कॅसिनो हा एक अनुभवदेखील यादगार राहील.
मनाली (Manali)
ख्रिसमस व नवीन वर्षांच्या सुट्ट्यांमध्ये बर्फेली पहाडी पाहण्याचे स्वप्न असेल, तर मनाली हा एक सुंदर पर्याय आहे. जर आपण सोलो ट्रीप करणार असाल, तर नो टेंशन. कारण हे फिरण्यासाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे. येथे आपण स्केटिंग, पॅराग्लायडिंग, माउंटन बाइक व ट्रेकिंचा ही आनंद घेवु शकता.
राजस्थान (Rajasthan)
जयपूर, जैसलपूर, जंतरमंतर व विविध राजवाडे हे नेहमीच पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी तयार असते. येथील भव्य किल्ले, मोठ-मोठे वाळवंट, भव्यदिव्य राजमहल, उंट, आकर्षक किल्ले व संगीताची जोड असणारे हे राजस्थान पर्यटनासाठी परफेक्ट पर्याय आहे. येथील जयपूरला ‘पिंक सिटी’ म्हणून ओळखले जाते.
केरळ (Keral)
भारतात पर्यटनासाठी केरळ हा जबरदस्त पर्याय आहे. येथे कमी खर्चात, तुम्ही पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. येथे फिरण्यासाठी मुन्नार, थेक्कडी, कुमारकोम अशी सुंदर व आकर्षक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. येथे हॉटेलदेखील आपल्या खिशाला परवडण्यासारखे आहे. त्यामुळे ख्रिसमस व नवीन वर्षाचा आनंद या सुंदर ठिकाणी मनसोक्त लुटा.