Wipro Q3 earnings: जागतिक स्तरावर, आयटी (IT: Information technology) क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने 31 डिसेंबर रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. विप्रोने सादर केलेल्या अहवालानुसार, तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 3 टक्क्यांनी वाढून 3 हजार 53 कोटी रुपये झाला आहे. तर महसुलात सुमारे 15 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याच वेळी, कंपनीच्या अॅट्रिशन रेटमध्ये घट झाली आहे जे एक चांगले चिन्ह आहे.
विप्रो लिमिटेडने शुक्रवारी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने सांगितले की एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 2.8 टक्क्यांनी वाढला आहे, जो 3 हजार 53 कोटी रुपये झाला आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या सर्वेक्षणात निव्वळ नफा 2 हजार 950 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, जो निकालाच्या काही अंशी जवळ जाणारा आहे.
2023 वर्षात 12 टक्के महसूल वाढ अपेक्षित (12% revenue growth expected in 2023)
डिसेंबर तिमाहीत विप्रोचा एकत्रित महसूल वार्षिक 14.3 टक्क्यांनी वाढून 23 हजार 229 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. महसूलासाठी 23 हजार 180 कोटी रुपयांचा अंदाज बांधण्यात आला होता, जो निकालाच्या अगदी जवळ आला आहे. विप्रोला आयटी सेवा व्यवसायातून चलनाच्या दृष्टीने 11.5 ते 12.0 टक्क्यांच्या दरम्यान महसूल वाढीची अपेक्षा आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा आयटी सेवांमधून मिळणारा महसूल वार्षिक 10.4 टक्क्यांनी वाढला आहे.
कंपनीचा एकत्रित करानंतरचा नफा, तिमाही आधारावर 15 टक्के दराने वाढला आहे. कंपनीच्या महसुलातही वाढ झाली आहे. त्याचबरोबर कंपनीतून बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. कंपनीने आपल्या भागधारकांसाठी लाभांशही जाहीर केला आहे. कंपनीने प्रति इक्विटी शेअर 1 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
विप्रोच्या अहवालानुसार, तिसऱ्या तिमाहीत आयटी सेवांमधून मिळणारे उत्पन्न 10.4 टक्क्यांनी वाढले आहे. ऑपरेटिंग मार्जिन 120 बेसिस पॉइंट्सने सुधारून 16.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. विप्रोचे मुख्य आर्थिक अधिकारी जतिन दलाल यांनी सांगितले की, मार्जिनचा हा विस्तार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, पदोन्नती आणि वरिष्ठ नेतृत्वासाठी दीर्घकालीन प्रोत्साहनांद्वारे प्रवृत्त केल्यानंतर होता. मार्जिन वाढ मजबूत ऑपरेटिंग सुधारणा आणि ऑटोमेशन-चालित कार्यक्षमतेमुळे चालते.
त्यांनी सांगितले की या तिमाहीत कंपनीने 26 टक्के वाढीसह 4.3 अब्ज युएस डॉलर किमतीचे सौदे केले आहेत. यामध्ये 69 टक्के मोठ्या डील बुकिंगचाही समावेश आहे. दलाल पुढे म्हणाले की, आम्ही ग्राहक संबंध अधिक दृढ करत आहोत आणि उच्च विजय दरांमुळे बाजारपेठेतील हिस्सा मिळवत आहोत. विप्रोने सलग चौथ्या तिमाहीत अॅट्रिशन रेटमध्ये घट पाहिली. मागील तिमाहीच्या तुलनेत मागील बारा महिन्यांसाठी कंपनीची घसरण 180 बीपीएसने (bps: Basis Points), म्हणजे 21.2 टक्क्यांनी आली आहे.
विप्रोने वरिष्ठ स्तरावर विक्रमी प्रमोशन केले आहेत. विप्रोने वरिष्ठ अधिकारी आणि अधिकाऱ्यांसह 73 कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. कंपनीने आपले नेतृत्व मजबूत करण्यासाठी आणि आपली प्रतिभा टिकवून ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. विप्रोने 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर पदोन्नती दिली. तर, 61 अधिकाऱ्यांना उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. त्याने आतापर्यंत केलेले हे सर्वाधिक प्रमोशन आहे. येथील टॅलेंटला रोखण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.