Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Wipro Outlook: विप्रोच्या शेअर्समुळे, हे गाव बनले करोडपती!

Wipro Outlook

Village became a millionaire due to Wipro shares: विप्रोचे शेअर्स हे नेहमीच गुंतवणुकदारांच्या आवडीचे राहिलेले आहेत. तज्ज्ञांच्यामते या कंपनीने नेहमीच नफा मिळवून दिलेला आहे, विप्रोच्या शेअर्समुळे अख्खे गावच कोट्याधीस बनले आहे. मात्र करोना काळात आणि त्यानंतर या कंपनीचे शेअर्स पडले. मात्र तरी अजुनही गुंतवणुकदार विप्रोवर विश्वास ठेवून शेअर्स विकत नाही आहेत. यामागील कारण समजून घेऊयात.

Wipro Shares: आयटी कंपनी विप्रोने आपल्या गुंतवणूकदारांवर मोठ्या प्रमाणात पैशांचा पाऊस पाडला आहे. 43 वर्षांपूर्वी एखाद्याने शेअर्समध्ये फक्त 10 हजार रुपये गुंतवले असतील आणि ते कायम ठेवले असतील तर आज तो सुमारे 985 कोटी रुपयांचा मालक असेल. विप्रो कंपनीची महाराष्ट्रातील ज्या गावातून सुरुवात झाली, त्या गावातील प्रत्येक सदस्याकडे किंवा कुटुंबाकडे विप्रोचे शेअर्स आहेत आणि आज ते गाव कोट्याधीशांचे शहर म्हणून ओळखले जाते.

गेल्या एका वर्षात हा स्टॉक सुमारे 45 टक्क्यांनी घसरला आहे. 2022 मध्ये हा हिस्सा 45.22 टक्क्यांनी कमी झाला आहे. विप्रोच्या शेअर्सची सध्याची किंमत निफ्टीवर 382 रुपये आहे. शुक्रवारी त्यात सुमारे 5 रुपयांची, अर्थात 1.27 टक्के घसरण झाली. तथापि, गेल्या वर्षभरात केवळ विप्रोलाच गुंतवणूकदारांच्या उदासीनतेचा फटका बसला नाही. इतर आयटी समभागांच्या बाबतीतही असेच घडले आहे.

मात्र, याआधी विप्रोने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला आहे. गेल्या 5 वर्षांत हा वाटा 64 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 726 रुपये आहे. त्याचा 52 आठवड्यांचा नीचांक 372.40 रुपये आहे. सध्या तो त्याच्या नीचांकाच्या अगदी जवळ आहे. असे असूनही, सध्या 40 पैकी केवळ 9 शेअर बाजार तज्ज्ञ या स्टॉकमध्ये राहण्याचा सल्ला देत आहेत. याशिवाय 19 तज्ज्ञ ते विकण्याचा सल्ला देत आहेत आणि 12 ते ठेवण्याचा सल्ला देत आहेत.

कंपनीने एवढ्या वर्षांत दिलेला नफा (Profit given by the company)-

1980 मध्ये, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये 10 हजार रुपये ठेवले असेल आणि ते कायम  ठेवले असतील तर ती व्यक्ती आज अब्जाधीश झाला असेल. आज त्या गुंतवणुकीचे मूल्य 985 कोटींच्या पुढे गेले असते. त्यावेळी या शेअरची किंमत फक्त 100 रुपये होती. आता या शेअरची किंमत 382 रुपये आहे. दरम्यान, कंपनीने आपले शेअर्स विभाजित केले आणि शेअरधारकांना बोनस शेअर्सही दिले. 1980 मध्ये, ज्या व्यक्तीने 10 हजार रुपये गुंतवून त्याचे 100 शेअर्स विकत घेतले, त्याच्याकडे आज कोणतेही अतिरिक्त पैसे न गुंतवता 2 कोटी 55 लाख 36 हजार शेअर्स आहेत. कंपनीने 1989, 1992, 1995, 1997, 2004, 2005, 2010, 2017 आणि 2019 मध्ये बोनस शेअर जारी केले. त्याच वेळी, 1999 मध्ये शेअर्सचे विभाजन झाले. अशा प्रकारे गुंतवणूकदारांच्या शेअर्सची संख्या खूप वाढली.

अशाप्रकारे गावकरी बनले कोट्याधीश! (Villagers became millionaires)-

महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर गावातून विप्रो कंपनीची सुरुवात झाली. 29 डिसेंबर 1945 रोजी मोहम्मद प्रेमजी यांनी शेती उत्पादनातील बाय प्रोडक्ट्सचा व्यवसाय सुरु केला. त्यांचे पहिले प्रोडक्ट खाद्यतेल हे होते. 
विप्रोची सुरुवात अमळनेरमधून झाली, आज हे गाव नसून शहर बनले आहे. या शहरातील प्रत्येक कुटुंबातील जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे विप्रोचे शेअर्स आहेत. असे म्हटले जाते, या शहरातील कोणाच्याही घरी बाळ जन्माला आले की विप्रोचे शेअर्स खरेदी केले जातात. अमळेनरवासियांनी विप्रोला अगदी सुरुवातीपासून साथ दिली आहे. आज विप्रो शेअरधारकांचे हे शहर कोट्याधीशांचे गाव किंवा शहर म्हणून ओळखले जाते.