Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Banking का महत्त्वाची आहे? काय आहेत त्याचे फायदे!

Online Banking

Online Banking : Digital World मध्ये Online Banking म्हणजेच E-Banking सर्वांच्याच सोयीची ठरली आहे. पण याचा वापर जरी सोपा असला तरी याच्या सुरक्षितेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

आपला प्रत्येक दिवस जेव्हा व्यस्त असतो. तेव्हा आपण शक्य तेवढा वेळ वाचवण्याचा विचार करत असतो. दैनंदिन कामांचा विचार केला तर, ऑनलाईन बँकिंगमुळे बँकेला भेट देणं ही दुर्मिळ घटना बनली आहे. त्यामुळे बँक आपल्याला सेवा देताना किती Charge आकारते किंवा बॅंकेत जमा असलेल्या पैशांवर किती Interest मिळतो. तसेच बँककडून कोणकोणत्या सोयी अजून मिळू शकतात, हे कळणे थोडे मुश्किल आहे. त्यामुळे त्याला पर्यायी म्हणून आताच्या Digital World मध्ये Online Banking म्हणजेच E-Banking सर्व धारकांना सोयीचे झाले आहे. त्याचा वापर जरी सोपा असला तरी सुरक्षेबाबत काळजी घेण्याजोगा आहे.

ऑनलाइन बँकिंग तुम्हाला तुमच्या खात्याचे Past Transaction आणि Current Transaction कुठूनही Access करण्याची परवानगी देते. व्यवहारामुळे तुमच्या खात्यात किती पैसे जमा आहेत? हे पाहण्याचा हा सर्वात जलद मार्ग आहे. हे तुम्हाला कोणत्याही अनधिकृत व्यवहारांबद्दल (Unethical Transactions) अधिक सक्षमपणे (Ethical and Secure) मदत करते. जेणेकरून तुम्ही त्यावर लगेच माहिती करू शकता. तसेच आपल्या खात्याचे Transactions आपल्या मोबाईलद्वारे स्वतः करू शकतो. जेणेकरून तुम्हाला तुमच्या Deposits and Payments ची माहिती मिळते. आता तर सारे Transaction हे Online पद्धतीनेच सुरू झाले आहेत. आपले खाते एकदा का मोबाईल ॲप्लिकेशनशी जोडले गेले की, आपण आपल्याला हवी ती गोष्ट घेऊन QR CODE स्कॅन करून संबंधित Transaction करू शकतो.

आपल्या Daily Routine मध्ये Online Banking का आणि किती महत्वाचे आहे; याचे काही मुद्दे

सुरक्षिततेची खात्री (Security Assurance)

Online Banking ही बँकांद्वारे Offer केल्या जाणार्या प्रमुख सेवांपैकी एक असल्याने, ते एक अत्यंत सुरक्षित Paltform देखील आहे. सर्व Client माहिती संरक्षित आहे आणि सुरक्षेचा कोणताही भंग होणार नाही याची खात्री करण्यासाठी बँका सामान्यत: Encryption उपकरणे वापरतात. हे शेवटी तुम्हाला ऑनलाइन फसवणूक आणि Account Hacking पासून Security प्रदान करते. जेणे करून आपले सर्व Transaction अतिशय सुरक्षित व सोयीचे होऊन जातात. 

केव्हाही व्यवहार करता येतो (24/7 Banking Service)

तुमच्या Bill Payments चा शेवटचा दिवस असला किंवा तुम्हाला तुमच्या Insurance चा हप्ता भरण्या शेवटची तारीख असली आणि तुम्हाला Penalty आकारण्यापासून काही मिनिटे दूर असले तरीही, तुम्ही Online Banking द्वारे त्याचे Transaction करू शकता. तुमच्या घरच्या सोयीनुसार दिवसातून केव्हाही Online व्यवहार करता येतात. इतकेच नाही तर, मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याऐवजी, तुम्ही कोणत्याही वेळी सुरक्षितपणे Amount Transfer करू शकता, त्या साठी तुम्हाला Bank मध्ये Physically Presence ठेवण्याची गरज नाही.

कोणतेही शुल्क नाही (No Hidden Charges)

आपले व्यवहार सुरळीत व सोयीचे करण्याची ही Online Banking ची सुविधा, किंवा आपले कोणतेही Online Transaction  करण्याशी संबंधित कोणतीही Hidden Fees किंवा त्या संभधित Charges घेतले जात नाहीत. जर तुमच्याकडून जेवढी Fees किंवा Charges आकारले जाते ते नाममात्र Transaction Process Amount आहे आणि बाकीची तुमची बँक व्यवस्थापित करते.

सोयीची हमी (Convenience Guaranteed)

ऑनलाइन बँकिंगच्या अनेक फायद्यांपैकी सुलभ प्रवेश (Easy Access) हा एक असला तरी, यामुळे बँकिंग अत्यंत सोयीस्कर बनते. बँकेत लांबच लांब रांगेत थांबण्याची गरज पूर्णपणे संपली आहे. शिवाय, बहुतेक बँकांसाठी Mobile Banking पर्याय उपलब्ध असल्याने Deposits आणि Payments करणे सोपे झाले आहे. तुम्ही कोठेही असाल किंवा कामाच्या गडबडीत, प्रवासात व्यवहार पूर्ण होऊ शकतात. एखादी गोष्ट किंवा वस्तू खरेदी करायची असल्यास किंवा त्याचे Payment करायचे असल्यास आपल्या Bank Account मध्ये किती पैसे शिल्लक आहेत याचीही माहिती Mobile Banking Application द्वारे आपल्याला मिळते.

तुमच्या खात्यावर तुमचे नियंत्रण (Monitor your Accounts Closely)

E-Banking मुळे अगदी आपल्या बोट्यांच्या साहाय्याने आपल्या खात्यावर नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे. त्या साठी फक्त आपल्या मोबाईल मध्ये आपले खाते असणाऱ्या bank चे ॲप्लिकेशन असायला हवे किंवा इतर payment upi id शी जोडून असायला हवे जेणे करून आपल्याला हवी तेव्हा हवी तिकडे shopping करता येते. त्यामुळे आपला खरच आणि आपली savings यावर नियंत्रण राहते. तसेच आपल्याला real time expenses चे ही निरीक्षण करता येते. तसेच आपले bank account सुरक्षित ही ठेवता येते. त्या साठी अनेक passwords ची मदत आपण घेऊ शकतो. ज्याला आपण unique characteristic असे म्हणतो. ते एकदा का सेट केले की आपल्या account ला आपल्या शिवाय कोणीही हात लावू शकत नाही.