Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Banking म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते?

Online Banking

Online Internet Banking, Mobile Banking, ATM, Debit and Credit Cards हे बँकिंगचे प्रमुख प्रकार आहेत. या वेगवेगळ्या प्रकारातून ग्राहकाच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण होण्यास मदत होते. त्या कशा होतात ते आपण समजून घेऊ.

ऑनलाईन बँकिंग सेवा (Online Banking Service) ग्राहकांना इंटरनेटद्वारे आर्थिक व्यवहार करण्याची परवानगी देते. ऑनलाईन बँकिंगला इंटरनेट बँकिंग (Internet Banking) किंवा वेब बँकिंग (Web Banking) म्हणूनही ओळखले जाते. ऑनलाईन बँकिंगद्वारे ठेवी (FD), हस्तांतरण (Transfer) आणि ऑनलाईन बिल देयकांसह (Online Bill Payment) स्थानिक पातळीवर बॅंकेद्वारे दिली जाणारी प्रत्येक सेवा ग्राहकांना दिली जाते. प्रत्येक बँकिंग संस्थेत ऑनलाईन बँकिंगचे काही प्रकार असतात. वेगवेगळ्या माध्यमांवर उपलब्ध आहेत. 

ऑनलाईन बॅंकिंगबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी,

  • ऑनलाईन बँकिंग सेवा इंटरनेटद्वारे आर्थिक व्यवहार करण्यास परवानगी देते.
  • ग्राहकांना बेसिक बँकिंग व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही.
  • ऑनलाईन बॅंकिंग सेवेसाठी ग्राहकाला Device, Internet Connection आणि Bank Card ची आवश्यकता असते. 
  • ग्राहकाने एकदा नोंदणी (Registration) केल्यानंतर ऑनलाईन सेवा सुरू करण्यासाठी Password सेट करावा लागतो.


बऱ्याच बँका साधारणत: Transfers आणि Bill Payments सारख्या मूलभूत सेवा देतात. काही बँका ग्राहकांना नवीन खाती उघडण्यास आणि Online Banking Portal द्वारे क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची परवानगी देतात. इतर बॅंकिंग सेवांमध्ये cheque book मागवणे, दिलेल्या चेकचे पेमेंट्स थांबवणे किंवा बॅंकेत अकाऊंट उघडण्यासाठी पत्ता बदलण्याची सेवा ऑनलाईन वापरता येते.

मोबाईल अॅपद्वारे आता चेक Online जमा करता येणार आहेत. Deposite करण्यासाठी चेकच्या पुढील आणि मागील भागाचा फोटो काढण्यापूर्वी ग्राहक फक्त रक्कम त्यावर टाकतो. ऑनलाइन बँकिंगमध्ये Traveler’s Cheques, Bank Drafts, काही Wire Transfer किंवा गहाण खतासारखे काही क्रेडिट अर्ज करण्याची परवानगी नाही. हे व्यवहार अजूनही बँकेच्या प्रतिनिधीशी समोरासमोर केले जातात.

काही बँका फक्त ऑनलाईन काम करतात. त्यांची कोणतीही प्रत्यक्ष branch नसते. या बँका फोन, ईमेल किंवा Online Chat द्वारे Customer Service हाताळतात. Wi-Fi आणि 5G नेटवर्क मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने आता मोबाईल डिव्हाईसवर Online Banking वारंवार केले जाते. डेस्कटॉप कम्प्युटरवरही ही सेवा वापरता येते.

Online Banking ची सेवा खालीलप्रमाणे ग्राहक वापरू शकतात.

  • मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग (Mobile and Internet Banking)
  • डेबिट आणि क्रेडिट कार्डस् (Debit and Credit Cards)
  • एटीएम (ATM's)
  • इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर (EFT)
  • ई-स्टेटमेंट (E-statement)


Online Internet Banking, Mobile Banking, ATM, Debit and Credit Cards हे बँकिंगचे मुख्य प्रकार आहेत. तथापि, या प्रत्येक प्रकारातून ग्राहकाच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण होतात. त्या कशा पूर्ण होतात, ते आपण समजून घेऊ.

मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग (Mobile and Internet Banking)

ऑनलाईन इंटरनेट बँकिंग म्हणजेच ई-बँकिंग हे जवळजवळ एकमेकांसारखेच आहेत. कोणताही व्यवहार म्हणजेच Financial किंवा Non-Financial जो आपण Bank च्या वेबपेजद्वारे म्हणजेच त्यांच्या Bank Website द्वारे किंवा Web Application द्वारे करतो, त्याला इंटरनेट बँकिंग (Internet Banking) म्हणतात.

डेबिट आणि क्रेडिट कार्डस् (Debit and Credit Cards)

क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स हे देखील ई-बँकिंगचाच भाग आहेत. Debit card आपल्याला ATM आणि POS म्हणजेच (point of scale) मशीन मधून सहज पैसे काढण्यास मदत करतात. तर दुसरीकडे credit card धारकांना borrow funds up to a pre-approved म्हणजेच एका ठराविक मर्यादेपर्यंत पैसे काढण्याची परवानगी देतात. तसेच त्यांना विविध Offer चा लाभ घेण्यास मदत करतात.

एटीएम (ATM's)

जेव्हा बँकांनी डिजिटल होण्यास सुरुवात केली तेव्हा एटीएम ही पहिली ई-बँकिंग सेवा होती. एटीएम पैसे काढण्याची आणि जमा करण्याची प्रक्रिया सोपी केली.

इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर (EFT)

EFT चा वापर एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे transfer करण्यासाठी केला जातो. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT), तात्काळ पेमेंट सर्व्हिस (IMPS) आणि रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) ही EFTची काही उदाहरणे आहेत. त्यामुळे, ई-बँकिंगमध्ये ऑनलाईन व्यवहार करण्याच्या विविध माध्यमांचा समावेश आहे.

ई-स्टेटमेंट (E-statement)

E-statement किंवा electronic statements ही तुमची नियमित bank statement online उपलब्ध करून दिली जाते. अनेक बँका आणि credit union सुरक्षेच्या कारणास्तव या प्रकारच्या ऑनलाइन बँकिंगची शिफारस करतात. Online banking किंवा e-banking system ची उपलब्धता, performance security देखरेख आणि application continuous security आणि सुरक्षित व्यवहार करण्यासाठी E-SPINची मदत घेतली जाते.