Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold Jewellery Shopping: दुबईत सोने एवढे स्वस्त का मिळते? दुबईहून कोण किती सोने आणू शकतात?

Why is gold so cheap in Dubai

Gold shopping in Dubai: आपल्या सगळ्यानाच माहिती आहे की दुबई ही गोल्ड सिटी आहे. दुबईतील सोन्याची शुद्धतेमुळे जगभरातील नागरिक दुबईत येतात.त्यात भारतीयच सर्वाधिक सोने खरेदी करतात. मात्र येथे सोने एवढे स्वस्त कसे मिळते हा प्रश्न कायम पडतो, त्यात दुबईला फिरायला गेल्यावर किती सोने खरेदी करून भारतात आणू शकतो?

Gold shopping in Dubai: दुबई हे शहर जगातील चमत्कारांपैकी एक मानला जाते. वाळवंट असलेल्या शहराकडे पाणी नव्हते, शेती होत नव्हती. मात्र शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या प्रयत्नामुळे हे शहर आज जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे, व्यवसायाचे हब बनले आहे, तसेच हे तेल निर्यात करणाऱ्यांपैकी एक आहेत. दुबईची चर्चा कधी त्यांच्या ग्लॅमरवरुन होते,  तर कधी तेथील कडक कायद्यांवरुन होते. दुबईच्या अर्थव्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते इथले सोने, दुबई शहराला गोल्ड सिटी म्हणून ओळखले जाते. तेलाबरोबरच दुबई जगात सर्वाधिक सोन्याची निर्यात करते.

दुबईतील नागरिकांनाही सोने खूप आवडते, येथील लोकांकडे सोन्याचे उंची दागिने, सोन्याची वाहने, याशिवाय सोन्याची भांडीही वापरली जातात. इथले लोक सोन्याला इतके सामान्य मानतात की कधी कधी जेवणातही सोन्याचा वापर करतात, उगाच नाही याला गोल्ड सिटी म्हणत. दुबाईच्या सोन्याची चर्चा अमेरिका ते श्रीलंका सगळीकडे होत असते. भारतीयांना तर सोन्यांचे प्रचंड आकर्षण त्यामुळे भारतीय दुबईला फिरायला गेले की सोन्याच्या दुकानांमध्ये सहज रमतात, मुख्य म्हणजे तेथे स्वस्त सोने मिळते त्यामुळे सोने खरेदीसाठीआपोआप पावले दुबईकडे वळतात, मात्र भारतात सोने आणण्यासाठी काही नियम आहेत.

दुबईतील सोन्याची गोष्ट (Gold story of Gold City Dubai)

दुबईत तेलाच्या खाणी आहेत, मात्र सोन्याच्या खाणी नाहीत. गोल्ड सिटीत, गोल्डच मिळत नाही. हो, दुबईत बहुतांश कच्चे सोने दक्षिण आफ्रिकेतून आणले जाते. मग दुबईत त्यावर प्रक्रिया करून, त्याची विविध आभूषणे बनवली जातात आणि पुढे त्याची विक्री होते. जगातील एकूण सोन्याच्या व्यापारापैकी फक्त दुबईचा वाटा 30 टक्के आहे, दरवर्षी 1 हजार 200 पेक्षा जास्त सोन्याची निर्यात केली जाते. या कारणास्तव, सध्या सोन्याच्या व्यवसायावर आधारित 4 हजार हून अधिक कंपन्या येथे आहेत. येथे सध्या 1 हजार पेक्षा जास्त, मोठी सोन्याची दुकाने आहेत. दुबईच्या बाजारात सोने खरेदी करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात. त्यामुळे येथील सोने बाजारात दररोज हजारो लोक सोने खरेदी करताना दिसतात.

दुबईमध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहतात. दुबईमध्ये राहणाऱ्या आशियाई लोकांपैकी तब्बल 50 टक्के भारतीय आहेत. त्यामुळे दुबईत भारतीय गुंतवणुकही जास्त आहे. या कारणास्तव, दुबईच्या सोन्याच्या बाजारपेठेतील बहुतेक खरेदीदार भारतातून येतात. भारताबाहेरही प्रामुख्याने पाकिस्तानी, ब्रिटिश, सौदी अरेबिया, ओमानी आणि कॅनेडियन लोक सोने खरेदीसाठी येथे येतात.

दुबईचे सोने जगातील सर्वात शुद्ध सोन्यांपैकी एक मानले जाते. येथे प्रत्येक दुकानदाराने त्याच्या सोन्याच्या शुद्धतेचा हॉल मार्क लावणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही जे काही सोने खरेदी कराल, त्यावर दुबईची छाप असेल, ज्यामध्ये त्यामध्ये किती सोने आहे हे सांगितले जाईल. हा हॉल मार्क न लावल्यास दुबईच्या कायद्यानुसार, त्या दुकानदाराला 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते, याशिवाय त्याला 1 कोटींपर्यंतचा दंडही भरण्याची शिक्षा मिळू शकते. दुबईच्या सोन्याची, कारीगिरीची, दागिने घडवण्याच्या पद्धतीची गुणवत्ता सर्वोत्तम मानली जाते. यासोबतच दुबईचे सोने जगातील इतर देशांच्या तुलनेत स्वस्त मिळते.

दुबईमध्ये भारताच्या तुलनेत 10 ग्रॅमवर 10 हजारपेक्षा जास्त सूट मिळेल. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे दुबईत सोन्यावर फारच कमी कर लावला जातो. या सोन्यावर माफक कर आकारला जात असल्यामुळे, सोने स्वस्त मिळते, याउलट भारतात सोन्यावर अनेक प्रकारचे मोठे कर लावले जातात, त्यामुळे येथे सोने खूप महाग मिळते.

दुबईत सोने खरेदीला प्राधान्य का? (Gold shopping in Dubai)

सोने खरेदीसाठी दुबईला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते, त्यामागील मुख्य कारण म्हणजे दुबईत सोन्याचा दर खूपच कमी आहे. जर आपण दुबईतील सोन्याच्या दराबद्दल बोललो, तर येथे 1 ग्रॅम सोन्याचा दर 216.00 संयुक्त अरब अमिराती दिरहाम (AED:  United Arab Emirates Dirham) आहे. 10 ग्रॅमचा दर 2 हजार 160 एइडी आहे. त्याचे भारतीय रुपयात रूपांतर केल्यास, त्याची किंमत 44 हजार 107 रुपये अशी होते. म्हणजेच दुबईतून खरेदी केलेले सोने सुमारे 44 हजारांच्या दराने उपलब्ध आहे, तर भारतात त्याचा दर जास्त आहे. जर आपण सध्या भारतातील सोन्याच्या दराबद्दल बोललो तर त्याची किंमत सुमारे 49 हजार रुपये आहे, याचा अर्थ सुमारे 6 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम नफा आहे. हा दर 24 कॅरेटच्या आधारे देण्यात आला आहे.

दुबईहून सोने खरेदी करण्याचे दुसरे म्हणजे येथील शुद्धता. येथील कठोर कायद्यांमुळे दुकानदार, विक्रेते फसवत नाहीत, हात चलाखी करत नाहीत. त्यामुळे जगभरात दुबईचे नाव अदबीने घेतले जाते. तर, तिसरे कारण म्हणजे येथले डिझाइन्स अधिक चांगल्या असतात. तिथे सोन्यावरची कलाकुसर वेगळी असते, अतिशय सूक्ष्म काम केलेले असते. भारतापेक्षा भारतीयांना सोन्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स दुबईत सापडतात, त्यामुळे लोक दुबईला सोने खरेदीसाठी जातात.

दुबईतून किती सोने आणू शकतो? (How much gold can bring from Dubai?)

परदेशात किती काळ राहिलात त्यावर सामानाची मर्यादा ठरलेली असते आणि त्यानुसार कस्टम ड्युटी (Customs Duty) ठरलेली असते. कस्टम ड्युटी अर्थात सीमाशुल्क किंवा जकात होय. एखादी व्यक्ती दुबईत स्थायिक असेल किंवा बऱ्याच वर्षांपासून कामाच्या निमित्ताने तेथे राहात असेल तर, तर सूट मिळते. वर्षभरापासून परदेशात राहणारे भारतीय 40 ग्रॅम सोने सोबत आणू शकतात. मात्र, ही मर्यादा महिलांना आहे. पुरुष केवळ 20 ग्रॅन सोने आणू शकतात. दुबईत काहीच दिवस काम किंवा फिरण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना गेला असता आणि त्यानंतर भारतात परतत असाल, तर नियम वेगळा आहे. पुरुष 50 हजार रुपयांपर्यंत आणि महिला 1 लाख रुपयांपर्यंतचे सोने खरेदी करू शकतात. कुटुंबातील इतर सदस्यांच्या आधारे, पाहिजे तेवढे सोने खरेदी करता येईल. हे नियम न पाळता सोने खरेदी केले तर मात्र 38.5 टक्के शुल्क भरावे लागू शकतो.