Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Scam: इतिहासातील सर्वांत मोठा Bre-X सोने खाण घोटाळा

Bre-X Mineral Scam

Market Scam Bre-X Mineral Scam: ब्रे-एक्स या सत्य घटनेवर आधारित गोल्ड चित्रपट 27 जानेवारी, 2017 मध्ये जगभर प्रदर्शित झाला होता. 90 च्या दशकात या घोटाळ्याने कॅनडामधील स्टॉक एक्सचेंजची झोप उडवून दिली होती.

Bre-X Minerals ही डेव्हिड वॉल्श यांनी 1989 मध्ये स्थापन केलेली खाण कंपनी होती. ती सुरूवातीला अल्बर्टा स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड होती; पण नंतर ती टोरोंटो स्टॉक एक्सचेंजमध्ये हलविण्यात आली. 1993 मध्ये वॉल्शने भूगर्भशास्त्रज्ञ जॉन फेल्डरहॉफ यांच्या सल्ल्यानुसार फिलीपाईन्समध्ये जमीन खरेदी केली. या जमिनीची देखरेख डी गुझमन हे करत होते. त्यांनी 1995 मध्ये या जमिनीत सोने सापडल्याचे जाहीर केले. यामुळे Bre-X मिनरल फर्मचे शेअर्स 1996 मध्ये सुमारे 1,000 पटीने वाढले. परिणामी याच्या शेअर्समधून कंपनीला सुमारे 6 बिलिअन डॉलर्सचे भांडवल मिळाले. जो पूर्वी पेनी स्टॉक म्हणून ओळखला जात होता. तर आजच्या मार्केट स्कॅम (Market Scam)मध्ये Bre-X सोने खाण घोटाळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Bre-X सोने-खाण घोटाळा आणि मायकेल डी गुझमन यांचा मृत्यू

19 मार्च, 1997 मध्ये Bre-X सोने खाण घोटाळ्यातून फसवणूक होत असल्याचे कळले. तसे भूगर्भशास्त्रज्ञ मायकेल डी गुझमन यांनी इंडोनेशियामध्ये हेलिकॉप्टरमधून उडी मारून आत्महत्या केली, असे बोलले जाते. चार दिवसानंतर पोलिसांना जंगलात एक मृतदेह सापडला. पण पत्रकार जॉन मॅकबेथच्या म्हणण्यानुसार, ज्या शहरातून हेलिकॉप्टरने गेले त्या शहरातील एका शवागारातून एक मृतदेह गायब झाला होता. तर डी गुझमन यांचा मृतदेह एका झाडाच्या रस्त्यापासून फक्त 400 मीटर अंतरावर सापडला होता. दरम्यान, हा मृतदेह कोणाचा यावर अनेक दिवस चर्चा आणि शोध सुरू होता. त्याचवेळी डी गुझमन यांनी पत्नी म्हणून सांगणाऱ्या एका महिलेला डी गुझमन यांच्या मृत्यूनंतर बरीच वर्षे पैसे मिळत होते, असे बोलले जाते.

वर्तमानपत्र व त्यावेळी उपलब्ध असलेल्या या माहितीवरून असे दिसून येते की, एखाद्या कंपनीला सोन्याची खाणीचा शोधा लागतो. ही खोटी बातमी पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक ही गोष्ट रचली गेली होती. 

असा घोटाळा उघडकीस आला 

भूगर्भशास्त्रज्ञ मायकेल डी गुझमन यांच्या आत्महत्त्या/मृत्यूच्या बातमीनंतर अवघ्या एका आठवड्यानंतर 26 मार्च, 1997 रोजी, अमेरिकन फर्म फ्रीपोर्ट-मॅकमोरॅन आणि Bre-X कंपनीची संभाव्य भागीदार कंपनी यांनी ऑस्ट्रेलियन भूवैज्ञानिक कॉलिन जोन्स यांच्या मार्गदर्शनाखाली त्या जमिनीची पाहणी करून तिथे खूपच कमी सोन्याचे प्रमाण असल्याचे जाहीर केले. या बातमीनंतर Bre-X च्या शेअर्सची प्रचंड प्रमाणात विक्री झाली. यामुळे या खाण कराराचा प्रस्ताव काही दिवस पुढे ढकलला गेला. 

दरम्यानच्या काळात Bre-X ने या जमिनीचा पुन्हा तपासणी करण्याची मागणी केली. त्यानुसार एका थर्ड पार्टी कंपनीच्या मदतीने त्या जमिनीची नव्याने तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल खूपच धक्कादायक होता. कारण इथल्या धातूमध्ये भेसळ करण्यात आली होती. यामध्ये बुसांग धातूचे नमुने सोन्याच्या धुळीने भेसळयुक्त करण्यात आले होते. या सर्व प्रकारामुळे TSE आणि NASDAQ वरील Bre-X कंपनीचा व्यापार बंद करण्यात आला आणि कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.


पुढे काय झाले?

कंपनीने केलेला घोटाळा उघडकीस आल्यानंतर Bre-X कंपनीला अनेक खटल्यांना सामोरे जावे लागले. तसेच कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागलेल्या गुंतवणूकदारांच्या रोषाचा सामना करावा लागला. या घोटाळ्यामुळे प्रामुख्याने तीन कॅनेडियन संस्थांचे मोठे नुकसान झाले. त्यात ओंटारियो म्युनिसिपल एम्प्लॉईज रिटायरमेंट बोर्ड (45 मिलियन डॉलर्सचे नुकसान), Caisse de dépôt et placement du Québec, क्यूबेक सार्वजनिक क्षेत्रातील पेन्शन फंड (70 मिलियन डॉलर्स) आणि ओंटारियो टीचर्स पेन्शन योजना (100 मिलियन डॉलर्स). 

सोन्याच्या घोटाळ्यात सहभागी झालेल्या कॅनडामधील कंपन्यांमुळे कॅनडाची आर्थिक कोंडी झाली. त्यावेळचे टोरंटो स्टॉक एक्स्चेंजचे प्रमुख यांची हकालपट्टी करण्यात आली. एकूणच या घोटाळ्यामुळे कॅनेडियन स्टॉक एक्स्चेंजमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.