2000 Rupee note ही अगदी सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. अनेकदा 2000 हजारची नोट बंद झाल्याच्या अफवाही पसरत असतात. आता पुन्हा एकदा 2000 Rupee note चर्चेत आली आहे. कारण सभागृहातच ही 2000 Rupee note बंद व्हावी अशी मागणी खासदार आणि माजी उपमुख्यमंत्री यांनी केली आहे. काय आहे हा संपूर्ण विषय ते जाणून घेऊया.
भाजपचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी सभागृहात शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला आहे. मोदी हे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री देखील आहेत.
का केली मागणी ?
2016 या वर्षी 500 व 1000 च्या नोटा बंद करण्यात आल्या. यानंतर 2000 हजार रुपयाची नोट आणण्यात आली होती. याच वेळी ही नोट भविष्यात बंद होईल, अशा प्रकारच्या चर्चेला सुरुवात झाली होती. आता सुशील कुमार मोदी यांनी 2 हजार रूपयाच्या नोटांना गुन्हेगारी कारवाया आणि आणि बेकायदेशीर व्यापारात मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे सांगत 2000 Rupee note वर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
2000 Rupee note 'या' वर्षीपासून झाली छपाई बंद
2000 Rupee note 2016 मध्ये आणण्यात आली होती. 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1000 च्या नोटा बंद झाल्या होत्या. यावेळी देखील 2 हजार रूपयाच्या नोटेविषयी विविध प्रकारे चर्चा होत होती. 2 हजारच्या नोटेमुळे काळ्या पैशाच्या निर्मितीला चालना मिळेल, अशी भूमिका त्यावेळी मांडण्यात आली होती.
आता व्यवहारही 2 हजारची नोट दिसून येत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. यातूनच अनेकदा ही नोट बंदी झाली, अशी अफवा पसरत असते. पण वस्तुस्थिती तशी नाही. रिझर्व्ह बँकेकडून 2019 पासून 2000 Rupee note छपाई झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे बाजारात 2 हजार रुपयाची नोट फारशी दिसून येत नाही.
2017-18 च्या आर्थिक वर्षात 2 हजार रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात चलनात होत्या. 6.72 लाख कोटीच्या 33 हजार 630 इतक्या नोटा बाजारात यावेळी होत्या. मात्र यानंतर छपाई बंद करण्यात आली. तशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही लोकसभेत यापूर्वी दिली होती. आता पुन्हा एकदा ही नोट चर्चेत आली आहे.