Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Narendra Modi यांच्या आरोग्याचा खर्च कोण करतं? सरकारकडून पंतप्रधानांना कोणत्या सुविधा मिळतात?

PM Narendra Modi

Image Source : www.timesnownews.com

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आरोग्याचा खर्च स्वतः करतात, आजतागायत सरकारी तिजोरीतून एकही रुपया त्यांच्या आरोग्यासाठी चर्च करण्यात आलेला नाही अशी माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.

PM Narendra Modi: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे सर्वाधिक चर्चेत असणारं व्यक्तिमत्त्व असून त्याचे जगभरात अनेक फॉलोवर्स आहेत. 2014 सालची निवडून आल्यानंतर मोदींनी जो काही राजकारणात पाय रोवला तो आजतागायत कायम आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी केलेल्या परदेश वाऱ्या ह्या जशा चर्चेचा विषय ठरल्या तशीच एक गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरतीये. ती गोष्ट आहे, नरेंद्र मोदींच्या आरोग्याचा खर्च कोण करतं?  पुण्यातील आरटीआय(RTI) कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा(Praful Sarada) यांनी हा प्रश्न माहितीच्या अधिकाराखाली विचारला आहे. ज्याचं उत्तर पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलंय. नेमकं काय म्हटलं आहे उत्तरात, चला जाणून घेऊयात.

आरटीआय अर्जला पंतप्रधान कार्यालयाकडून काय उत्तर मिळालं?

आरटीआय कायदा(Right to Information Act) 2005 साली अंमलात आला आणि त्यांनतर सर्वसामान्य लोकांना या कायद्याअंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार मिळाला. याच अधिकाराचा वापर करून पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा(Praful Sarada) यांनी पंतप्रधान कार्यालयाला, नरेंद्र मोदींच्या आरोग्याचा खर्च कोण करतं? असा प्रश्न विचारलायं. या प्रश्नालाही पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर देण्यात आल आहे. 
पंतप्रधान कार्यालयातील सचिव विनोद बिहारी सिंह(Secretary in Prime Minister's Office Vinod Bihari Singh) यांनी प्रफुल्ल सारडा यांच्या आरटीआय अर्जाला उत्तर दिलंय. त्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्या वैयक्तिक आरोग्याच्या उपचारासाठी सरकारने तरतूद केलेली आहे. मात्र याचा वापर करण्याची आजवर वेळ आलेली नाही. 2014 पासून आजतागायत मोदींच्या आरोग्याच्या खर्चासाठी पंतप्रधान कार्यालयाने एकही रुपया खर्च केलेला नाही. आपल्याकडे खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना(MPs and Union Ministers) यासंदर्भात अनेक सोयी-सुविधा पुरविल्या जातात, अगदी त्याचप्रमाणे पंतप्रधानांना देखील अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरीही मोदींनी आतापर्यंत स्वतःच्या आरोग्याचा खर्च सरकारी तिजोरीतून न करता स्वतःच केलाला आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीतून आजवर यासाठी एकही रुपया खर्च झालेला नाही.

प्रफुल्ल सारडा यांचे यावर मत काय?

प्रफुल्ल सारडा(Praful Sarada) यांना पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तरानंतर त्यांनी असे म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या उपचाराचा खर्च स्वतःच करुन देशातील 135 कोटी नागरिकांना एक नवी प्रेरणा दिली आहे. लोक त्यांच्या कष्टाचा पैसा कर स्वरूपात सरकारकडे जमा करतात, अशावेळी त्या पैशाचा वापर खुद्द पंतप्रधान सुद्धा वैयक्तिक कामांसाठी करत नाहीत हे पाहून त्यांच्यावरील विश्वास आता आणखी दृढ झाला आहे. त्यामुळे इतर खासदार आणि आमदारांनी सुद्धा त्यांचे स्वतःचे वैयक्तिक खर्च स्वतःच्याचं पैशांतून करायला हवेत असे सारडा यांनी म्हटले आहे.  

सरकारकडून पंतप्रधानांना कोणत्या सुविधा मिळतात?

  • पंतप्रधानांना महिन्याला सुमारे 1,60,000 रुपये मिळतात. त्यांचे मूळ वेतन 50,000 रुपये आहे. याशिवाय त्यांना खर्च भत्ता 3,000 रुपये आणि खासदार भत्ता 45,000 रुपये मिळतो. यासोबतच दैनंदिन खर्चासाठी 2,000 रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याला 61,000 रुपये मिळतात. हे सर्व मिळून 1,60,000 रुपये पगार स्वरूपात मिळतात 
  • पंतप्रधानांना आजीवन मोफत निवास उपलब्ध करून देण्यात येते 
  • याशिवाय त्यांना प्रवासासाठी आलिशान गाड्या दिल्या जातात, ट्रेनमधून पूर्णपणे मोफत प्रवास करता येतो व परदेशी दौऱ्यासाठी स्वतंत्र विमान देखील उपलब्ध आहे
  • मोफत वैद्यकीय खर्च देखील मिळतो 
  • याशिवाय सेवानिवृत्तीनंतर 5 वर्षासाठी 14 जणांची सचिवीय टीम मिळते व एक वर्षासाठी एसपीजी सुरक्षा देण्यात येते. 
  • मोफत वीज आणि पाणी देखील त्यांना मिळते 
  • सेवा निवृत्तीच्या पाच वर्षांनंतर वैयक्तिक सहाय्यक आणि शिपाई याशिवाय कार्यालयीन खर्चासाठी वार्षिक 6,000 रुपये मिळतात