Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gautam Adani यांचे भाऊ Vinod Adani यांच्यावर Forbes ने कोणते आरोप केलेत? विनोद अदानी कोण आहेत?

Who is Vinod Adani

Image Source : www.reuters.com

Who is Vinod Adani : हिंडेनबर्ग अहवालाच्या परिणामातून अजून गौतम अदानी सावरलेले नाहीत. त्यातच आता फोर्ब्सच्या एका अहवालामुळे त्यांचे भाऊ विनोद अदानीही गोत्यात आले आहेत. अदानी यांच्या समुहामध्ये परदेशातून येणारे पैसे विनोद अदानी ‘मॅनेज’ करत होते असा त्यांच्यावर आरोप आहे. विनोद अदानी काय करतात आणि त्यांच्यावर नेमके कुठले आरोप झालेत बघूया…

शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गने (Hindenburg Report) काही दिवसांपूर्वी अदानी समुहाला (Adani Group) मोठा झटका देणारा एक नकारात्मक अहवाल जाहीर केला. या अहवालामुळे जानेवारीच्या सुरुवातीला 127 अब्ज डॉलर्स असलेली गौतम अदानींची (Gautam Adani) एकूण संपत्ती 50 अब्ज डॉलरच्या खाली घसरल्याचे पाहायला मिळाले. अजूनही अदानी समूह यातून पुरेसा सावरलेला नाही. त्यानंतर आता दिग्गज बिझनेस मॅगझिन फोर्ब्सने गौतम अदानींचे भाऊ, विनोद अदानी (Vinod Adani) यांच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

फोर्ब्सच्या अहवालानुसार, विनोद अदानी यांनीच परदेशातल्या कंपन्यांनांना अदानी समुहामध्ये पैसे गुंतवण्यासाठी राजी केलं. आणि हे सगळे व्यवहार बेकायदेशीर आहेत. म्हणजे ज्या कंपन्यांमधून अदानी समुहात गुंतवणूक होत होती (ज्यामुळे अदानी समुहाच्या कंपन्यांचे शेअर चढत होते) त्या कंपन्या विनोद अदानी नियंत्रित करत होते. अशा काही कंपन्यांमध्ये त्यांची हिस्सेदारीही होती. आणि या गुंतवणुकीसाठी पैसे उभारताना त्यांनी मनी लाँडरिंगही केलं असण्याची शक्यता आहे.

आधीच्या हिंडेनबर्ग अहवालातही विनोद अदानी यांचं नाव अनेकदा आलेलं होतं. आता फोर्ब्स यांच्या टिकेचा संपूर्ण रोकच त्यांच्यावर आहे. आणि विनोद ही कामं बेकायदेशीरपणे करत होते असं सांगणारे काही व्यवहारही फोर्ब्सने उघड केले आहेत.

उदाहरणार्थ, विनोद अदानींची सिंगापूर मध्ये Pinnacle Trade and Investment Pte. नावाची कंपनी आहे. या कंपनीला अप्रत्यक्षपणे LTE द्वारा नियंत्रित करण्यात येते. LTE  म्हणजे Long Term Evolution. LTE तुम्हाला डेटा आणि कॉलिंग एकाच वेळी वापरायला देऊ शकते. या कंपनीने अदानी समूहाच्या प्रमोटरची हिस्सेदारी गहाण ठेवून स्टेट बँक ऑफ रशियाकडून $240 लाखांचे कर्ज घेतले आहे. आणि हे पैसे अदानी समुहात गुंतवण्यात येतात असा आरोप आहे.

दाव्यानुसार, विनोद अदानी यांचं अप्रत्यक्ष नियंत्रण असलेल्या कंपनीने कर्जासाठी गॅरेंटर रहावं म्हणून Afro Asia Trade and Investments Limited आणि Worldwide Emerging Market Holdings Limited या कंपन्यांना निधी दिला आहे. या सगळ्यामध्ये विनोद अदानी यांचे नाव पुढे आल्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. यानिमित्ताने त्यांच्या बद्दल जाणून घेऊयात.

विनोद अदानी कोण आहेत? 

Vinod Adani

  • जन्म आणि शिक्षण: गुजरातमधील जैन कुटुंबात जन्मलेले विनोद अदानी (Vinod Adani) हे अदानी भावंडांमध्ये सर्वात मोठे आहेत. गौतम अदानींचे मोठे भाऊ म्हणून विनोद अदानींना ओळखलं जातं. त्यांचा जन्म 24 जून 1962 सालचा. गुजरातमधील स्थानिक शाळेमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी यूएस विद्यापीठातून (US University) अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी (Post Graduation) संपादन केली. सध्या ते सायप्रसचे (Cyprus) नागरिक असले तरीही दुबईत राहतात. सायप्रस हा युरेशियन द्वीप देश असून त्याची राजधानी निकोसिया (Nicosia) आहे.  
  • व्यावसायिक वाटचाल: 1976 मध्ये त्यांनी मुंबईमधील भिवंडी परिसरातील व्हीआर टेक्सटाईलसोबत (VR Textiles) आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कमोडिटी पोर्टफोलिओचा सिंगापूरमधील कार्यालयासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठा विस्तार केला. सध्या ते साखर, तेल, अॅल्युमिनियम, तांबे आणि लोखंडाच्या स्क्रॅपचा व्यवसाय करतात. ज्यामध्ये ते उत्पादक देशांकडून टनांमध्ये व्यावसायिक उत्पादने खरेदी करतात आणि गरजू देशांना विकतात. दुबई, सिंगापूर आणि जकार्ता येथे त्यांचे व्यवसाय आहेत.
  • एकूण संपत्ती: नुकत्याच जाहीर झालेल्या IIFL Wealth Hurun India Rich List 2022 नुसार, विनोद शांतीलाल अदानी यांचा सर्वात श्रीमंत NRI म्हणून उल्लेख केला आहे.  हुरुनच्या अहवालानुसार विनोद अदानी दररोज सुमारे 102 कोटी रुपये कमावतात, तर त्यांची एकूण संपत्तीची अंदाजे $ 2,100 USD इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार 1,69,000 कोटी रुपये.

    हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 च्या अहवालानुसार, गेल्या वर्षात विनोद अदानींची एकूण संपत्ती 37,400 कोटी रुपयांनी वाढल्याचे सांगितले आहे.  गेल्या पाच वर्षांत विनोद अदानी यांच्या संपत्तीत एकूण 9.5 पट इतकी वाढ झाली आहे. त्यांना प्रणव अदानी (Pranav Adani)आणि कृपा अदानी (Krupa Adani) अशी दोन मुलं आहेत. जी त्यांना व्यवसाय सांभाळण्यासाठी मदत करत आहेत.

हिंडेनबर्ग अहवालामध्ये विनोद अदानींचे नाव

24 जानेवारी रोजी प्रकाशित झालेला हिंडेनबर्ग अहवालाने अदानी समूहाला आणि  अध्यक्ष गौतम अदानींना चांगलेच हेलावून सोडले आहे. मात्र या अहवालामध्येही तब्बल 151वेळा विनोद अदानी (Vinod Adani) यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता.  

हिंडेनबर्गने आपल्या अहवालात विनोद अदानी यांच्यावर बनावट कंपनी चालवल्याचा आरोप केला होता. त्यांनी अहवालात म्हटलं होतं की, त्यांच्या कंपनीचा पत्ता, काम आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांची माहिती स्पष्ट नाहीये.

याशिवाय अनेक सरकारी संस्था विनोद अदानी यांची चौकशी करत आहेत, परदेशात बनावट कंपन्या चालवल्याचा, त्या कंपन्यांकडून अब्जावधी डॉलर्स कमावल्याचा आणि तो पैसा अदानी समुहात गुंतवून ग्रुप कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढवल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.