Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gautam Adani : अदानी टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

Gautam Adani

Image Source : www.dnaindia.com

अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) अहवालानंतर गौतम अदानी (Gautam Adani) यांचे मोठे नुकसान झाले आहे. ते टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. आता ते कितव्या स्थानावर आहेत? ते पाहूया.

अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) अहवालानंतर गौतम अदानी (Gautam Adani) यांचे मोठे नुकसान झाले आहे. अहवालापूर्वी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी आता ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत 11व्या क्रमांकावर आले आहेत. गौतम अदानी यांची संपत्ती 36.1 अब्ज डॉलरने कमी होऊन 84.21 अब्ज डॉलरवर आली आहे. या यादीत रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी 12 व्या क्रमांकावर आहेत. म्हणजे आता गौतम अदानी आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यात एकाच क्रमांकाचा फरक राहिला आहे.

हे आहेत पहिले पाच श्रीमंत

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या यादीत बर्नार्ड अर्नाल्ट पहिल्या क्रमांकावर आहे. ज्यांची एकूण संपत्ती 189 अब्ज डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर इलॉन मस्क आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 160 अब्ज डॉलर आहे. तिसर्‍या क्रमांकावर जेफ बेझोस आहेत, ज्यांची संपत्ती 124 अब्ज डॉलर आहे. बिल गेट्स या यादीत चौथ्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती 111 अब्ज डॉलर आहे. वॉरन बफेट पाचव्या क्रमांकावर आहेत, ज्यांची संपत्ती 107 अब्ज डॉलर असल्याचे सांगितले जाते.

हे आहेत सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर

लॅरी एलिसन 99.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आहे. लॅरी पेज सातव्या क्रमांकावर आहे, ज्यांची एकूण संपत्ती 90 अब्ज डॉलर आहे. स्टीव्ह बाल्मर 86.9 अब्ज डॉलरसह आठव्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी सर्जी ब्रिन 86.4 अब्ज डॉलरसह नवव्या क्रमांकावर आहेत. कार्लोस स्लिम 85.4 अब्ज डॉलरसह दहाव्या स्थानावर आहे.

अदानींवर हिंडेनबर्गचा आरोप

गेल्या आठवड्यात हिंडेनबर्गने गौतम अदानी यांच्या कंपनीबाबत अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, अदानी समूहाने आपले अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीला भ्रमित करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंडेनबर्गने अदानी समूहाच्या कंपन्यांबाबत एकूण 413 पानांचा अहवाल तयार केला आहे. अहवालात दावा करण्यात आला आहे की, अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फसवणुकीत गुंतला आहे. यासोबतच अदानी समूहाचे शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या महत्त्वाच्या कंपन्यांवर खूप कर्ज असल्याचेही सांगण्यात आले आहे.