Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank hikes FD Intrest rates : तुमच्या एफडीवर मिळणार अधिक रक्कम, जाणून घ्या कोणत्या बँकेने वाढवले आहेत व्याजाचे दर

Bank hikes FD Intrest rates

यूको बँकेने एफडीवरील व्याजाचे दर वाढवले आहेत. 2 डिसेंबरपासून हे नवे दर लागू होतील. याचा एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे.

मुदत ठेवींमध्ये पैसे जमा करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खूशखबर आहे. पब्लिक सेक्टरमधील UCO बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात  वाढ केली आहे. त्यामुळे एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांचे रिटर्न्स आता आणखी वाढणार आहेत.

2 कोटींपर्यंतच्या रकमेवर हे नवे व्याजदर 2 डिसेंबर 2022 पासून पासून लागू असतील. ही वाढ मुदतीच्या कालावधीनुसार भिन्न असेल.  46 दिवसांपासून पुढील दिवसांसाठीचा मुदतपूर्ती कालावधी यासाठी उपलब्ध असणार आहे. 6.50 टक्के असा यामध्ये सर्वाधिक व्याजदर असेल.

लहान कालावधीसाठी मिळेल असा व्याजदर

7 ते 29 दिवस इतक्या मुदतपूर्ती कालावधीसाठी जमा केल्या जाणाऱ्या रकमेवर 2.90 टक्के इतका व्याजाचा दर तर 30 ते 45 दिवसांच्या कालावधीसाठी 3 टक्के व्याजाचा दर कायम राहील. 46 ते 90 दिवस इतकी मुदतपूर्ती असणाऱ्या रकमेवरील  व्याजरात 0.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा व्याजदर 3.50 टक्क्यावरून 4 टक्क्यांपर्यंत पोचला आहे. 91 ते 120 दिवस इतकी मुदतपूर्तीसाठी 3.75 टक्के असणारा व्याजदर आता 4 टक्के इतका झाला आहे. 121 ते 150 दिवस कालावधीसाठी जमा होणाऱ्या रकमेवर 4.50 टक्के इतके व्याज मिळेल. यापूर्वी ते 3.75 टक्के इतके होते. 151 ते 180 दिवसांसाठी याआधी 3.75 टक्के इतके व्याज मिळत होते. ते आता 5 टक्के इतके मिळेल.

6 महिन्यांच्या पुढील कालावधीसाठी मिळेल असा व्याजदर

181 ते 364 या कालावधीसाठी केलेल्या एफडीवर यापूर्वी 4.65 टक्के इतके व्याज मिळत होते. ते आता 6 टक्के इतके वाढवण्यातत आले आहे. 1 वर्ष कालावधीसाठी 5.75 टक्क्यांवरून 6.35 टक्के इतके केले आहे. 1 ते 2 वर्षे या कालावधीसाठी 5.75 टक्क्यांवरून 6.20 टक्के इतका तर 2 ते 5 वर्षे कालावधीसाठी एफडी केलेल्या रकमेवर 6 टक्के इतके व्याज मिळेल. जे पूर्वी 5.60 टक्के इतके होते. यूको बँकेने 5 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक कालावधीच्या मुदतपूर्तीसाठी व्याजदर 5.50 टक्क्यावरून 6 टक्के इतके वाढवले आहेत.

वरिष्ठ नागरिकांना अधिक लाभ (FD interest rates) 

बँकेने त्यांचे कर्मचारी व निवृत्त कर्मचारी त्याचबरोबर वरिष्ठ नागरिकांना अधिकचा व्याजदर देऊ केला आहे. कर्मचाऱ्यांना 1 तर सेवानिवृत्त स्टाफ आणि वरिष्ठ नागरिकांनासाठी 1 वर्षापर्यंत 1.25 टक्के तर त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी 1.50 टक्के असा अधिकचा व्याजदर देऊ केला आहे.