Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SUV launched in 2022: या वर्षी देशात लाँच झालेल्या 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या कार कोणत्या?

SUV launched in 2022

SUV launched in 2022: तुम्ही जर कार खरेदीचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 10 लाखाच्या आत असेल तर 2022 मध्ये लाँच झालेल्या काही SUV तुम्ही खरेदी करू शकता, जाणून घेऊया कंपनी, SUV आणि किमतीबद्दल.

SUV launched in 2022: कोरोनामुळे अनेकांचे आर्थिक बजेट ढासळले, अशात जर तुम्ही 10 लाखाच्या आतील SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी 2022 मध्ये लाँच झालेल्या काही SUV बेस्ट ऑप्शन असू शकतात. ऑटो मोटर्स कंपन्यांसाठी हे वर्ष खूप चांगले होते. विक्री आणि नवनवीन प्रकारच्या कमी किमतीत SUV आल्याने विक्रीमध्ये झालेली वाढ या दोन्ही गोष्टींमुळे ऑटोमोटर्स कंपन्यांना मोठी मदत झाली. SUV मध्ये नवनवीन अपडेट पाहायला मिळाले, त्यामुळे ग्राहकांचे आकर्षण अधिकच वाढले. जाणून घेऊया 10 लाखाच्या आतील किमत असलेल्या SUV बद्दल. 

मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno)

या वर्षी मारुतीने आपली प्रीमियम हॅचबॅक कार बलेनोची फेसलिफ्ट सिरिज लॉन्च केली. यामध्ये सीएनजीचे ऑप्शन आहे. त्याचे 1.2L पेट्रोल इंजिन 90PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क निर्माण करते. हेड-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्सिंग कॅमेरा, हिल-होल्ड असिस्ट, 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, ESC, 360-डिग्री कॅमेरा अशी वैशिष्ट्ये या कारमध्ये उपलब्ध आहेत. 

Hyundai वेन्यू  फेसलिफ्ट (Hyundai Venue facelift)

Hyundai Venue देखील याच वर्षी अपडेटेड फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. याला 1.2L पेट्रोल, 1L टर्बो पेट्रोल आणि 1.5L डिझेल इंजिनांची निवड मिळते जे अनुक्रमे 83PS आणि 114Nm, 120PS आणि 172Nm आणि 100PS आणि 240Nm निर्मिती करतात. या कारमध्ये कूल्ड ग्लोव्हबॉक्स, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, एअर प्युरिफायर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 8-इंच टचस्क्रीन डिस्प्ले, सनरूफ वायरलेस फोन चार्जिंग, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. 

टोयोटा ग्लान्झा (Toyota Glanza)

टोयोटाने मारुती बलेनो ग्लान्झा अपडेट केला आहे. सर्व फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बलेनो प्रमाणेच आहेत. ही कार CNG वर 30 kmpl मायलेज देते. 

सायट्रोन c3 (Citroen c3)

फ्रेंच कार निर्मात्या सिट्रोएनने त्यांची हॅचबॅक कार C3 लाँच केली. त्याचा लूक कॉम्पॅक्ट एसयूव्हीसारखा आहे. यात उंची-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, चार-स्पीकर, ड्युअल फ्रंट एअरबॅग, EBD सह ABS, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. 

मारुती ब्रेझा (Maruti Brezza) 

मारुतीनेही यावर्षी आपला Brezza अपडेट केला आहे. यामुळे विटारा बॅज काढण्यात आला आहे. या कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 103PS आणि 137 Nm आउटपुट करते. या कारमध्ये सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 4 स्पीकर, पॅडल शिफ्टर्स, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले, सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत  रुपये आहे. 

या वर्षी देशात लाँच झालेल्या कारच्या किमती (Prices of cars launched in the country this year) 

SUV मॉडेल 

किमती 

मारुती सुझुकी बलेनो

6.49 लाख

Hyundai वेन्यू  फेसलिफ्ट

7.53 लाख

टोयोटा ग्लान्झा

6.59 लाख

सायट्रोन c3

5.88 लाख 

मारुती ब्रेझा

7.99 लाख