Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Saving Tips: बचतीचे ठराविक कारण नसेल तर तुम्ही पैसे कोठे सेव्ह करू शकता?

Saving Tips

Saving Tips: ज्या व्यक्तींचे निश्चित असे आर्थिक उद्दिष्ट नसेल त्या व्यक्ती वगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतात. या गुंतवणुकीतून त्यांना अपेक्षित परतावा नको. पण गुंतवलेली रक्कम सुरक्षित कशी राहील, याची शाश्वती मात्र नक्कीच हवी असेल. अशा लोकांसाठी अनेक प्रकारच्या बचतीच्या योजना उपलब्ध आहेत. त्यातील काही निवडक बचत योजनांबद्दल जाणून घेऊ.

प्रत्येक व्यक्ती ठराविक उद्दिष्ट मनाशी बाळगून आपले आयुष्य जगत असतो. प्रत्येकाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. काही जण पैसे मिळवून सर्व सोयीसुविधा प्राप्त करण्यासाठी जगत असतात. तर काही जण नवीन घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी पैसे कमावतात. पण आपल्या समाजात अशीही काही माणसे आहेत. ज्यांच्याकडे बचत करण्याचे ठोस असे कारण नाही. तर आज आपण अशा व्यक्तींसाठी बचतीचे कोणकोणते पर्याय असू शकतात. हे जाणून घेणार आहोत.

जोखीम विरहित आणि सुरक्षित गुंतवणूक (Risk Free & Safe Investment)

आर्थिक उद्दिष्ट निश्चित असेल तर त्यानुसार बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायातून गुंतवणूकदार आपले उद्दिष्ट पूर्ण करू शकतो किंवा किमान त्याच्या जवळपास जाऊ शकतो. जसे की काही गुंतवणूकदारांना कमी कालावधीत जास्त परतावा अपेक्षित असेल तर शेअर्स, इक्विटी मार्केटमधून चांगला परतावा मिळवू शकतात. परताव्या प्रमाणेच यामधील जोखीम पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. तर काही गुंतवणूकदार हे जोखीम न स्वीकारता निश्चित आणि सुरक्षित परताव्याची अपेक्षा ठेवणारे असतील, तर ते पोस्ट ऑफिस किंवा मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करतील.

ज्या व्यक्तींचे निश्चित असे आर्थिक उद्दिष्ट नसेल त्या व्यक्ती वगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतात. या गुंतवणुकीतून त्यांना अपेक्षित परतावा नको. पण गुंतवलेली रक्कम सुरक्षित कशी राहील, याची शाश्वती मात्र नक्कीच हवी असेल. अशा लोकांसाठी अनेक प्रकारच्या बचतीच्या योजना उपलब्ध आहेत. त्यातील काही निवडक बचत योजनांबद्दल जाणून घेऊ.

बचत खाते हे सध्याच्या काळातील खूपच बेसिक खाते मानले जाते आणि ते प्रत्येकाचे असणे अपेक्षित आहे. यासाठी सरकार जनधन योजनेद्वारे सर्वांचे विनामूल्य झिरो बॅलन्स बचत खाते सुरू करून देत आहे. बचत खात्यावर सध्या फक्त 3 ते 2.50 टक्के व्याजदर मिळते. ज्यांना फक्त पैसे बचत करायचे आहेत. त्यांच्यासाठी बचत खाते (Saving Account) खूपच फायदेशीर ठरू शकते. कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील किंवा खाजगी बँकेमध्ये बचत खाते सुरू करता येते. बचत खात्यातील गुंतवणूक ही कमी परतावा मिळवून देणारी गुंतवणूक असली तरी ती सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.  

आपत्कालीन निधी (Emergency Fund)

बचत करण्याचे कोणतेही ठोस कारण नसेल तर कोणतीही व्यक्ती आपत्कालीन फंड निर्माण करू शकते. आपत्कालीन फंड हा एक असा निधी असतो. जो ऐनवेळी येणाऱ्या संकटामध्ये वापरला जातो. फक्त हा निधी जमा करताना तो अशा ठिकाणी जमा केला पाहिजे. जेणेकरून तो लगेच काढता येईल किंवा गरज असेल तेव्हा त्याचा वापर करता येईल.

मुदत ठेवी (Fixed Deposit)

मुदत ठेवी हा एक जोखीम मुक्त आणि सुरक्षित गुंतवणूक प्रकार आहे. सध्या अनेक बँका मुदत ठेवींवर चांगले व्याजदर देत आहेत. मुदत ठेवींमध्ये दीर्घकालीन आणि अल्प मुदतीसाठी बचत करता येते. सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खाजगी बँका आणि स्मॉल बँका किमान 7 दिवसांपासून दीर्घकाळांच्या मुदत ठेवी योजना राबवतात.

रिटायरमेंट प्लॅन (Retirement Plan)

निवृत्ती नियोजन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण एकदा का नियमित उत्पन्न मिळवण्याचे वय उलटून गेले की, उर्वरित आयुष्य व्यवस्थित जगण्यासाठी रिटायरमेंट प्लॅनिंग आवश्यक आहे. निवृत्ती नियोजनासाठी कोणत्याही सुरक्षित योजनेत पैसे गुंतवता येतात. याच्या नियोजनामुळे तुमचे उतारवयातील आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होऊ शकते.

अशाप्रकारे विविध प्रकारच्या योजनांमध्ये पैसे गुंतवता येतात. यामध्ये गुंतवणूकदाराची जोखीम स्वीकारण्याची तयारी असेल तर तो शेअर मार्केट, म्युच्युअल फंड या गुंतवणूक योजनांमध्येही पैसे गुंतवू शकतात.