व्हाट्सॲप हे ॲप आपल्यापैकी बरेच जण वापरतात. 'मेटा' या मार्क झुकेरबर्ग यांच्या मालकीच्या कंपनीने व्हाट्सॲप सुविधेत वेगवेगळे पर्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. गेल्या काही महिन्यापासून व्हाट्सॲप वेगवेगळे फीचर्स युजरसाठी घेऊन येत आहे. याचाच एक भाग म्हणून आता 'स्टेटस आर्काइव' चा पर्याय युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
होय, ज्या पध्द्तीने इन्स्टाग्रामवर जुने स्टेटस बघता येतात तशीच सोय व्हाट्सॲपच्या या नव्या फिचरमध्ये असणार आहे. तसेच 24 तास हे स्टेटस लाईव्ह असेल आणि त्यांनतर ते आर्काइवमध्ये जाईल. मागील तीस दिवसांचे स्टेटस युजर्सला बघता येतील. विशेष म्हणजे ही सुविधा केवळ व्यावसायिक खात्यांनाच दिली जाणार आहे.
व्यावसायिकांना फायदा काय?
व्हाट्सॲप वर आपल्या उत्पादनांचे प्रमोशन करून व्यवसायवृद्धी करणारे अनेक लोक आहेत. व्यावसायिक कारणासाठी जर तुम्ही व्हाट्सॲप वापरत असाल तर तुम्हाला सदर मोबाईल नंबर 'व्यावसायिक' श्रेणीत रजिस्टर करावा लागतो. अशा बिजनेस खात्यांना वेगवेगळ्या सुविधा व्हाट्सॲपकडून दिल्या जातात.
आता स्टेटस आर्काइवची सुविधा उपलब्ध झाल्यास व्यावसायिकांना त्यांचे जुने स्टेटस पुन्हा पब्लिश करता येणार आहेत. म्हणजे वारंवार नव्याने कंटेंट पब्लिश करण्याची गरज उरणार नाहीये.
‘Status Archive’ feature coming to WhatsApp business#WhatsApp #whatsappbusiness#WhatsAppNumberList #WhatsApps
— Bandaurdu (@bandaurdu) May 29, 2023
Link:- https://t.co/DnUymyyB7O pic.twitter.com/ve7UnWHxp9
कधी होईल फिचर लाईव्ह
मेटाने जारी केलेल्या निवेदनानुसार सध्या केवळ बीटा युजर्ससाठी (Beta Users) ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या काही दिवसात सर्व बिजनेस खात्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती कंपनीने दिली आहे.
स्वतंत्र युजरनेम आणण्याच्या तयारीत
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार व्हाट्सॲप खात्याला युजर्स स्वतंत्र युजरनेम देऊ शकणार आहेत. लवकरच तसे फिचर व्हाट्सॲप घेऊन येणार आहे.सध्या त्यावर काम सुरू असून येत्या काही दिवसांत ते ॲपवर अपडेट केले जाईल असेही कळते आहे.
इन्स्टाग्राम, फेसबूक आणि ट्विटरवर ज्या पध्द्तीने युजर्सला स्वतंत्र युजरनेम असते तसेच आता व्हाट्सॲप युजर्सला देखील घेता येणार आहे. म्हणजेच यापुढे केवळ मोबाईल नंबरवर निर्भर न राहता युजरनेमने देखील हव्या त्या व्यक्तीशी संपर्क साधता येणार आहे.