असुरक्षित कर्ज हे एक अशा प्रकारचे कर्ज आहे जे घेताना कोणतीही वस्तु, मालमत्ता तारण ठेवण्याची आवश्यकता नसते. हे कर्ज मंजुर होणे हे अर्जदाराच्या विश्वासावर आधारित असते. या कर्जाला वैयक्तिक कर्ज म्हणून देखील संबोधले जाते आणि सामान्यत: उच्च क्रेडिट रेटिंग असलेल्या कर्जदारांना प्रदान केले जाते. वैयक्तिक कर्जाचे व्याज दर अंतर्गत ठरावाप्रमाणे पक्के किंवा बदलणारे असू शकतात.
असुरक्षित कर्जाचे प्रकार
ग्राहक विविध उपयोगांसाठी वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करतात. तथापि, कोणतेही वैयक्तिक कर्ज, हेतू विचारात न घेता, दोन प्रमुख श्रेणींमध्ये येते: फिरते कर्ज आणि मुदत कर्ज.
फिरते कर्ज/रिवोल्विंग लोन
रिव्हॉल्व्हिंग लोन हे कर्ज आहे ज्यामध्ये कर्जाची एक मर्यादा दिलेली असते, कर्जदार कोणत्याही वेळी काढू शकणारी कमाल रक्कम ठरवुन दिलेली असते. तसेच कर्जदार काही ठराविक कालावधीसाठी ही रक्कम कर्जाऊ घेऊ शकतात. हा कालावधी 1 महिना, 3 महिने, 6 महिने किंवा कोणतीही पूर्व निर्धारित वेळ असू शकते. कर्जदार रक्कम अंशतः किंवा संपूर्णपणे परत करू शकतो आणि पूर्वनिर्धारित मर्यादेमधेच पुन्हा पैसे काढू शकतो. ठरवलेल्या कालावधीच्या समाप्तीनंतर, कर्जदाराने रक्कम आणि काढलेल्या रकमेवर कोणतेही व्याज परत करणे बंधनकारक आहे. क्रेडिट कार्ड हे फिरत्या कर्जाचे उदाहरण मानले जाऊ शकते. कर्जदाराला विहित मर्यादेत आणि निर्दिष्ट कालावधीत हवी तेवढी रक्कम काढण्याचे स्वातंत्र्य आहे. ही कर्जे सामान्यत: बदलत्या व्याज दराने दिली जातात.
मुदत कर्ज
मुदत कर्ज हे वैयक्तिक कर्ज आहे, जिथे कर्जदाराला एकरकमी रक्कम मिळते आणि कर्जदार त्याच्या मुदतीच्या शेवटी कर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत निश्चित हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड करतो. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी किंवा स्थिर मालमत्तेच्या खरेदीसाठी ग्राहक सहसा मुदत कर्ज निवडतात. ही कर्जे सामान्यत: निश्चित व्याज दराने दिली जातात.
एकत्रीकरण किंवा कन्सोलिडेशन कर्ज
वर्तमानात सुरु असलेले असुरक्षित कर्ज किंवा क्रेडिट कार्ड कर्ज फेडण्यासाठी हे एकत्रीकरण कर्ज आहे.
कर्जाच्या वापरावर आधारित कर्जाचे प्रकार
लग्न कर्ज
भारतात लग्न हा एक महागडा कार्यक्रम असतो. तुमच्या लग्नाचा संपूर्ण खर्च पेलण्यासाठी तुम्ही मुदत कर्जाची निवड करु शकता.
सुट्टीचे कर्ज
तुम्हाला फ़िरायला जायचं आहे परंतु खर्च एकत्र करणे परवडणार नाही?तुम्ही कर्ज घेउन तुमची सुट्टी आनंददायी बनवु शकता.
उत्सव कर्ज
फेस्टिव्हल लोन ही कमी व्याजदराने दिलेली वैयक्तिक कर्जे आहेत. सणासुदीच्या काळात ऑफर केलेल्या प्रक्रिया शुल्काच्या माफीसारख्या फायद्यांसह ही वैयक्तिक कर्जे मिळू शकतात. क्रेडिट कार्ड देखील तुलनेने लहान खर्च पूर्ण करण्यासाठी वापरली जाऊ शकते. तथापि, इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करणे, कार्यक्रम आयोजित करणे इत्यादींसाठी वैयक्तिक कर्ज घेतले जाऊ शकतात.
होम रिनोव्हेशन कर्ज
तुमच्या घराचे स्वरूप बदलण्यासाठी आणि अपग्रेड करण्यासाठी ते अधिक सुंदर आणि मोहक बनवण्यासाठी आहे. याव्यतिरिक्त, तुमचे घर सुधारण्यासाठी गृह सुधार कर्ज घेऊ शकता.
टॉप-अप कर्ज
टॉप-अप लोन ही आधीपासून अस्तित्वात असलेल्या कर्जावर अधिक घेतलेली रक्कम आहे. त्यामुळे तुमच्याकडे वैयक्तिक कर्ज असल्यास आणि तुम्हाला अधिक पैशांची आवश्यकता असल्यास, तुम्ही आधीच अस्तित्वात असलेल्या कर्जापेक्षा जास्त रकमेसाठी अर्ज करू शकता, जे एकाच कर्जामध्ये एकत्रित केले जाईल. दोन किंवा अधिक ईएमआय परतफेड भरणे या समस्येला सामोरे जाण्याऐवजी साधे आणि सरळ एकच EMI परतफेड सोपा पर्याय ठरतो.
ब्रिज लोन
ब्रिज लोन हे अल्प कालावधीसाठी आवश्यक असलेले कर्ज आहे. ह्याचा परतफ़ेडीचा कालावधी जास्तीत जास्त 12 महिन्यांपर्यंत वाढू शकतो.
पेन्शन कर्ज
निवृत्त व्यक्तींना पेन्शन कर्ज दिले जाते. हे कर्ज तुम्हाला अचानक आणि अनपेक्षित आर्थिक आणीबाणीला तोंड देण्यासाठी निधी प्रदान करते.