Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी सांगणारा “Rule of 72” नियम काय आहे?

what is rule of 72

Rule of 72: आपण कष्टाने कमावलेल्या पैशांची जेव्हा कोणत्याही आर्थिक व्यवहारामध्ये गुंतवणूक करत असतो, तेव्हा साहजिकच त्यातून आपल्याला चांगले “रिटर्न्स” मिळावेत, अशी अपेक्षा असते. ते कसे मिळू शकतील हे आपण “72 चा नियमा”तून समजून घेणार आहोत.

Rule of 72: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक म्हणजे लाखाचे 12,000 करायचे धंदे, राजकारण म्हणजे 1760 भानगडी, अमुक एकाचे तीन-तेरा वाजले किंवा एखाद्याने धंदा पार चौपट करून टाकला, रोजच्या आपल्या बोलण्यामध्ये अशी “56 उदाहरणे” अगदी सहजपणे येत असतात. आर्थिक गुंतवणुकीचे विश्व तर अशा जादूमय आकड्यांनी व्यापून गेलेलं आहे. आपला “Hard Earned Money” अर्थात आपण कष्टाने कमावलेल्या पैशांची जेव्हा कोणत्याही आर्थिक व्यवहारामध्ये गुंतवणूक करत असतो, तेव्हा साहजिकच त्यातून आपली एक अपेक्षा असते, की आपल्याला चांगले “रिटर्न्स” मिळावेत.

“पैसे दुप्पट करण्याची हमी देणारी” पोस्ट ऑफिसची “किसान विकास पत्र” (Kisan Vikas Patra-KVP) योजना तर लोकप्रिय आहेच. “पैसे दाम-दुप्पट करून देण्याचा मंत्र” देत अनेक चिट-फंड कंपन्यांनी लाखो लोकांची फसवणूकही केली आहे. पण आर्थिक गुंतवणुकीच्या गणिताचे असे एक सार्वत्रिक सूत्र आहे. ज्याला “Rule of 72” किंवा “72 चा नियम” म्हणतात आणि ज्याच्या मदतीने आपण काही सेकंदात शोधू शकतो की “आपले पैसे किती वेळा दुप्पट होतील”.

विशिष्ट वार्षिक दराने गुंतवलेली रक्कम दुप्पट होण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज लावण्यासाठी हा “Rule of 72” वापरला जातो. हा “72 चा नियम” कसा ॲप्लाय करायचा? याचे साधेसरळ सूत्र म्हणजे [N = 72 / r] ज्यामध्ये N कालावधीची संज्ञा आहे. 72 हा आपला स्थिरांक (Constant Number) असून r हा व्याज-दर (Rate of Interest) आहे.

हे सूत्र वापरण्यासाठी, व्याज दराने 72 या संख्येला भागायचे असते. यासाठी आपण खाली दिलेले पर्याय उदाहरणांसह पाहुयात. जर आपल्याला बँकेमध्ये बचत खात्यामध्ये (Savings Account) मध्ये पैसे ठेऊन दर साल दर शेकडा 4% दराने व्याज मिळणार असेल, तर 72/4 = 18 म्हणजेच 4% व्याज-दराने आपण बचत केलेली रक्कम दुप्पट होण्यासाठी 18 वर्षे लागतील. त्याचप्रमाणे मुदत ठेवींमध्ये (FD मध्ये) 8% परतावा मिळतो. तर 72 ला 8 ने भागले तर, 72/8 = 9, म्हणजे बँकेतील मुदत ठेवींमध्ये केलेली गुंतवणूक 9 वर्षांत दुप्पट होईल. जरी हा नियम 6 ते 10 टक्के व्याज दराने मोजला तरी याचे प्रमाण योग्य पद्धतीनेच होते. पण यापेक्षा जास्त व्याजदर घेतला तर त्याच्या प्रमाणात थोडा किंवा मोठा फरक पडू शकतो.

MONEY DOUBLING CHART INFOGRAPHIC

त्याचप्रमाणे गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट होण्यासाठी “किती टक्के व्याजदर असणे” आवश्यक आहे, याचे उत्तर मिळविण्याकरिता 72 या संख्येस वर्षाच्या संख्येने भागल्यास जी संख्या येते. ती संख्या आपले पैसे दुप्पट करू शकण्यासाठी “आवश्यक व्याज-दर” मिळवून देते. उदाहरणार्थ, आपण म्युच्युअल फंडमध्ये एक लाख रुपये गुंतविले, तर आपल्या गुंतवणुकीची 4 ते 5 वर्षांच्या कालावधीमध्ये दुप्पट रक्कम होण्यासाठी आपल्याला किमान 15% व्याजदराने “रिटर्न्स” (Returns) मिळणे आवश्यक आहे.

72 च्या नियमाचा पुरस्कार्ता कोणा आहे?

गुंतवणूक केलेला पैसा किती वर्षांत दुप्पट होईल, हे निश्चित करण्यासाठीचा हा “72  चा नियम” प्रसिद्ध इटालियन गणितज्ज्ञ आणि “फादर ऑफ बुक किपींग” फ्रा लुका बारटोलोनिओ डी पासिओली (लुका दी बॉरगो) यांनी मांडला. ही एक संख्यात्मक संकल्पना आहे, जी आपण केलेल्या गुंतवणुकीचे दुप्पट रकमेमध्ये रूपांतर होण्यासाठी किती वेळ लागेल, याचा अंदाज लावते. हा एक साधा फॉर्म्युला आहे; जो प्रत्येकजण वापरू शकतो. तसेच, हा निकष फक्त चक्रवाढ वाढीसाठीच लागू केला जाऊ शकतो. त्याची गणना साधे व्याज देणाऱ्या प्रकरणी लागू केली जाऊ शकत नाही. चक्रवाढ व्याज (Compound Interest) हे 'व्याजावर मिळालेले व्याज' असते, याचा अर्थ ते मुद्दल आणि मिळविलेले व्याज दोन्हीवर मिळवले जाते.

72 चा नियम “हॅरी पॉटरची मॅजिक स्टिक” नाही 

अर्थात, 72 चा नियम म्हणजे काही “हॅरी पॉटरची मॅजिक स्टिक” नाही. अगदी तुम्ही-आम्ही देखील या नियमाचा वापर करून आपली गुंतवणूक दुप्पट केव्हा होईल, हे जाणून घेऊ शकतो. “72 चा नियम” अशा कुठल्याही व्याजदराला लागू होते, ज्याची वाढ चक्रवाढ पद्धतीने होत असते. उदाहरणार्थ, आपली लोकसंख्या, Macro-economics Numbers, घेतलेले कर्ज इत्यादी. “Rule of 72” प्रमाणे, आपण गुंतवलेले पैसे किती दिवसांत तिप्पट होतील हे जाणून घेण्यासाठी “Rule of 114”, तर आपली इन्व्हेस्टमेंट 4 पट किती कालावधीमध्ये होऊ शकते, यासाठी “Rule of 144” हे सूत्र उपयोगात आणले जाते. यासाठी आपल्याला 114 ला आणि 144 ला व्याज-दराने विभाजित करावे लागते.