Why is Bitcoin price stabilizing: जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टो नाणी बिटकॉईन (Bitcoin) आणि इथरियम (Ethereum) यांनी शुक्रवारीदेखील 16 हजार युएस डॉलर आणि 1 हजार 200 युएस डॉलरवर स्थिर राहिले आहेत. तर दुसरीकडे, डॉजकॉईनने (Dogecoin) 24 तासांमध्ये 5 टक्के एवढी वाढ नोंदवली असून सर्व नाण्यांमधील ही सर्वाधिक वाढ आहे. हेलियम (HNT) टोकन 12 टक्क्यांहून अधिक 24-तास बुडवून सर्वात मोठा तोटा ठरला. काल 22 डिसेंबर रोजी हेलियम (Helium) नाण्याने दरात सर्वाधिक 31 टक्क्यांची वाढ नोंदवली होती, मात्र आज 23 डिसेंबर रोजी अर्थात मागील चोवीस तासांमध्ये 10 टक्क्यांनी घसरण झाली आहे. सर्व नाण्यांमधील ही सर्वाधिक घसरण आहे. यावेळी जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप 812.76 बिलियन युएस डॉलरवर होते. मागील चोवीस तासांत 0.25 टक्क्यांची वाढ झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.
बिटकॉईनच्या किंमतीत अजुनही घसरण सुरू आहे, परंतु ही घसरण अगदीच लहान आहे. मुख्य म्हणजे, सध्या दरात स्थिरता निर्माण होत आहे. अमेरिकेतील तिसऱ्या तिमाहिचा जीडीपी (GDP) डेटा सादर झाल्यानंतर त्यात 0.3 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. अमेरिकेचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा (Gross domestic product) दर 3.2 टक्क्यांवर गेला आहे, म्हणूनच बिटकॉईन स्थिरस्थावर होऊ लागला आहे, असे मुद्रेक्स (Mudrex)या क्रिप्टो गुंववणूक माध्यमाचे (crypto investment platform) को- फाऊंडर (Co-Founder) आणि सीईओ (CEO) एड्युल पटेल यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले आहे.
आजच्या क्रिप्टोकरन्सींच्या किंमती Cryptocurrency Prices Today:
- बिटकॉईन (Bitcoin): बिटकॉइनची किंमत मागच्या चोवीस तासांमध्ये 16 हजार 830 युएस डॉलरवर स्थिर आहे. तर, या काळात 0.18 टक्क्यांची घसरण झाली आहे. क्रिप्टोकरन्सीच्या बाजाराची लाईव्ह माहिती 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता घेण्यात आली आहे. कॉईन मार्केट कॅपवरुन (CoinMarketCap) घेतली आहे. भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्म वझीरएक्सनुसार (WazirX), आज बिटकॉईनचा दर 14.34 लाख रुपये आहे.
- इथरियम (Ethereum): या नाण्याची किंमत 1 हजार 222.31 युएस डॉलरवर गेली आहे.सकाळी 10 वाजता यात 0.68 टक्के एवढी वाढ झाल्याचे दिसत होते. कालच्या तुलनेत या नाण्याने 0.13 टक्के एवढी वाढ नोंदवली आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतात इथरियमची किंमत 1.04 लाख एवढी आहे.
- डॉजकॉईन (Dogecoin): 5.46 टक्क्यांची उडी घेत, मागील चोवीस तासांत सर्वाधिक किंमत वाढीचा दर या नाण्याने नोंदवला आहे. सकाळी 10 वाजता याची किंमत 0.07777 युएस डॉलर एवढी होती. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतातील डोजकॉईनची किंमत 6.48 रुपये एवढी आहे.
- लाइटकॉईन (Litecoin): या नाण्याच्या दरात मागील चोवीस तासांत 1.03 टक्कयांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सकाळी 10 वाजता 66.22 युएस डॉलर एवढ्या दरावर व्यापार सुरू होता. या नाण्याची भारतात किंमत 5 हजार 568.14 एवढी आहे.
- रिपल (Ripple): या नाण्याचा दर 0.3494 युएस डॉलर एवढा सकाळी 10 वाजता होता. मागील चोवीस तासात या नाण्याने 1.58 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसले. झीरएक्सनुसार (WazirX), भारतात या नाण्याची किंमत 29.50 रुपये एवढी आहे.
- सोलाना (Solana): मागील चोवीस तासांमध्ये 0.95 टक्क्यांची घसरण होत, या नाण्याची सकाळी 10 वाजता किंमत 12 युएस डॉलर एवढी नोंदवली गेली. याची भारतातील किंमत 1 हजार 31 एवढी आहे.