Cryptocurrency Prices Register Minor gains: मागील अनेक दिवसांपासून क्रिप्टोच्या विविध नाण्यांच्या दरात मोठी घसरण दिसून येत होती. मात्र आज, गुरुवारी दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता दिलासादायक चित्र पाहायला मिळाले. बिटकॉइन (Bitcoin), जगातील सर्वात जुने आणि सर्वात मौल्यवान क्रिप्टो नाणे, 16 हजार युएस डॉलरवर स्थिरावल्याचे दिसून आले. तर इथरियम (Ethereum) 1 हजार 200 युएस डॉलरवर स्थिरावले. हेलियम (Helium) नाण्यामध्ये मागील चोवीस तासांमध्ये 31 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून सर्व करन्सींमधील सर्वाधिक वाढ झाली आहे. यावेळी जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप 811.19 बिलियन युएस डॉलरवर होते. मागील चोवीस तासांत 0.21 टक्क्यांची वाढ झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.
आजच्या क्रिप्टोकरन्सींच्या किंमती Cryptocurrency Prices Today:
- बिटकॉईन (Bitcoin): बिटकॉइनची किंमत 0.20 टक्क्यांनी मागील चोवीस तासांत वाढली आहे. 16 हजार 863.43 वर किंमत स्थिरावली, क्रिप्टोकरन्सीच्या बाजाराची लाईव्ह माहिती कॉईन मार्केट कॅपवरुन (CoinMarketCap) घेतली आहे. भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्म वझीरएक्सनुसार (WazirX), बिटकॉईनची (Bitcoin) किंमत 14.40 लाख रुपये होती.
- इथरियम (Ethereum): या करन्सीची किंमत 1 हजार 214.66 वर होती, चोवीस तासांमध्ये 0.55 टक्क्यांनी दरात वाढ दिसून आली आहे. वझीरएक्सनुसार, भारतात इथरियमची किंमत 1.03 लाख रुपये होती.
- डॉजकॉईन (Dogecoin): या नाण्याने मागील चोवीस तासांमध्ये 1.61 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. सध्या किंमत 0.07381 युएस डॉलर एवढी झाली आहे. वझीरएक्सनुसार, भारतातील डोजकॉईनची किंमत 6.48 रुपये होती.
- लाइटकॉईन (Litecoin): मागील चोवीस तासांमध्ये या नाण्यात 0.64 टक्के वाढ दिसून आली आहे. सकाळी 10 वाजता हे नाणे 65.57 युएस डॉलरवर व्यापार करत होते. भारतात या नाण्याची किंमत 5 हजार 562.18 रुपये होती.
- रिपल (Ripple): सकाळी 10 वाजता हे नाणे 0.3439 किंमतीवर होते. मागील चोवीस तासांमध्ये 1.19 टक्क्यांवर लहानशी उडी घेतली. काल सकाळी 10 वाजताच्या तुलनेत आज सकाळी 10 वाजता या नाण्याच्या किंमतीत सुमारे 0.95 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. या नाण्याचा भारतीय किंमतीनुसार 29.16 लाख एवढा दर होतो.
- सोलाना (Solana): या नाण्याची किंमत मागील चोवीस तासांमध्ये 0.62 टक्क्यांनी वाढली आहे. सकाळी 10 वाजता याची किंमत 12.12 युएस डॉलर एवढी होती. तर या नाण्याची भारतातील किंमत 1 हजार 65 एवढी होती.
सध्या नाताळ (Christmas) सण, नववर्ष (New Year) आणि सुट्टीचा हंगाम सुरु झाल्यावर भारतासह संपूर्ण जागतिक क्रिप्टो बाजार हळूहळू स्थिर होऊ लागला आहे, असे विट्रेडचे (weTrade) संस्थापक प्रशांत कुमार यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.