Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Canara Bank Fd Interest Rate: कॅनरा बँकचे एफडीवरील व्याजदर किती? जाणून घ्या डिटेल्स

Canara Bank

Image Source : http://www.sentinelassam.com/

Canara Bank Fd Interest Rate: आता सार्वजनिक क्षेत्रातील बँक कॅनरा बँक फिक्स्ड डिपॉझिटची (Canara Bank Fixed Deposit) अतिशय चांगली योजना देत आहे. जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मुदत ठेव (FD) मध्ये गुंतवणूक (investment) करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही कॅनरा बँकेच्या विशेष 400 दिवसांच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता.

Canara Bank Fd Interest Rate: भारतातील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी RBI ने रेपो दरात सातत्याने वाढ केली आहे. यामुळे तुमचा ईएमआय आणि कर्ज महाग झाले आहे. रेपो दरात वाढ झाल्यामुळे अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदरही एकापाठोपाठ एक वाढवले ​​आहेत. या सिरिजमध्ये आता सार्वजनिक क्षेत्रातील बँक कॅनरा बँक फिक्स्ड डिपॉझिटची अतिशय चांगली योजना देत आहे. जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मुदत ठेव (FD) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही कॅनरा बँकेच्या विशेष 400 दिवसांच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता. बँक या योजनेअंतर्गत गुंतवणुकीवर सात टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे.

400 दिवसांवर 7.75 टक्के व्याज.. (7.75 percent interest for 400 days..) 

मिळालेल्या माहितीनुसार, 400 दिवसांच्या मुदत ठेवीवर वार्षिक 7.75 टक्के दराने व्याज मिळेल. या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधू शकता. 15 लाखांवरील नॉन-कॉलेबल ठेवींवर, बँक सामान्य लोकांना 400 दिवसांच्या ठेवीवर 7.45 टक्के दराने व्याज देत आहे. त्याच वेळी, या कालावधीसाठी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के वार्षिक दराने व्याज मिळेल. हे नवीन दर 18 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहेत.

666 दिवसांच्या एफडीवर 7.5% व्याज.. (7.5% interest on 666 days FD..)

कॅनरा बँक 666 दिवसांच्या मुदत ठेवीवर सात टक्के दराने व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.5 टक्के दराने व्याज मिळेल. दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपेक्षा कमी मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 6.8  टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.3  टक्के दराने व्याज मिळेल. तीन वर्षांपेक्षा जास्त आणि पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर सर्वसामान्य नागरिकांना 6.5  टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7 टक्के दराने व्याज मिळेल. 

या बँकांनी एफडीवरील व्याजदरही वाढवले….. (These banks also increased interest rates on FDs….) 

रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी रेपोमध्ये 5 वेळा वाढ केली होती. RBI ने 7 डिसेंबर 2022 रोजी द्विमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर आणखी 0.35 टक्क्यांनी वाढवून 6.25 टक्क्यांवर आणला होता. कॅनरा बँक, एसबीआय, पीएनबी, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँक, जना स्मॉल फायनान्स बँक (Canara Bank, SBI, PNB, Kotak Mahindra Bank, HDFC Bank, Suryodaya Small Finance Bank, Yes Bank, Jana Small Finance Bank) इत्यादींनीही त्यांचे एफडी दर वाढवले ​​आहेत. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर एफडी दर वाढवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे.