Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

National Pension System: NPS Tier 1 आणि NPS Tier 2 मध्ये काय फरक आहे?

National Pension System

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS ) या पेन्शन योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात दोन प्रकारची अकाऊंट उघडता येतात. यामध्ये गुंतवणूकीचा निर्णय घेण्यापूर्वी त्यात काय फरक आहे ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

पेन्शन योजनांमध्ये एनपीएस ही एक महत्वाची योजना आहे. या पेन्शन योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात 2 अकाऊंट असतात. यात काय काय फरक आहे ते जाणून घेऊया.

एनपीएस खाते उघडण्याविषयी .. (NPS Account Opening)

तुम्हाला केवळ एनपीस टियर 2 अकाऊंट उघडता येत नाही. एनपीएस टियर 1 अकाऊंट सोबतच ते उघडले जाऊ शकते. ज्यावेळी टियर 1 खाते बंद केले जाते तेव्हा टियर 2 खातेसुद्धा बंद करणे आवश्यक आहे. NPS Tier 1 आणि NPS Tier 2 खात्यामधील हा बेसिक फरक म्हणता येईल. दोन्ही अकाऊंट एकाच PRAN ने जोडलेली आहेत. तुमच्याकडे केवळ एक PRAN असू शकतो.

कमीत कमी किती पैसे भरावे लागतात? 

एनपीएस टियर 1 अकाऊंटसाठी प्रत्येक वित्तीय वर्षात कमीत कमी 1 हजार रुपये भरणे आवश्यक आहे. एनपीएस टियर 2 अकाऊंटसाठी कमीत कमी किती रक्कम भरायला हवी, अशी मर्यादा घालण्यात आलेली नाही.  

NPS Tier 1 आणि NPS Tier 2 अकाऊंटचे पैसे काढण्याचे नियम 

एनपीएस टियर 1 एक सेवानिवृत्ती अकाऊंट आहे. यामुळे मुदतपूर्तीच्या आधी पैसे काढण्यावर अनेक बंधने आहेत. मुलांचे शिक्षण, लग्न, गंभीर आजारावरील उपचार तसेच पहिल्या घरासाठी पैसे काढता येतात. त्यासाठी अकाऊंट उघडल्याननंतर 10 वर्षे त्यात पैसे भरणे आवश्यक आहे. तसेच यावेळी 25 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येते. टियर 2 अकाऊंटमधून पैसे काढण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. या अकाऊंटमधून तुम्ही तुमची पूर्ण गुंतवणूक देखील मोकळी करू शकता. 
एनपीएसमधून एक्झिटच्या वेळी एनपीएस टियर 1 खात्यात जमा राशीवर  40% टक्के रक्कम annuity च्या खरेदीसाठी आवश्यक असते. जर सेवानिवृत्तीच्या अगोदर अकाऊंट बंद केल तर टियर 1 खात्यातील जमा रकमेतील 80 टक्के रकम annuity साठी आवश्यक असते. टियर 2 खात्यावर अशी कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही संपूर्ण रक्कम एकत्रितपणे  परत घेऊ शकता. 

अकाऊंट ओपनिंग, पैसे भरणे, मुदतीपूर्वी एनपीएस खत्यातून पैसे काढणे अशा अनेक बाबतीत राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या (NPS) टियर 1 आणि टियर 2 खात्यामध्ये फरक आहेत. याचबरोबर टॅक्सबाबतही फरक आहेत. मात्र हे बेसिक म्हणता येतील असे NPS Tier 1 आणि NPS Tier 2 खात्यातील फरक आहेत.