Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is DigiLocker?: डिजीलॉकर म्हणजे काय?

What is DigiLocker?

Image Source : http://www.play.google.com/

What is DigiLocker?: डिजीलॉकरमध्ये असणारी कागदपत्रेही चेकिंग करण्यासाठी मान्य असतील अशी परवानगी ट्रॅफिक पोलिस (Traffic Police) आणि रेल्वेने दिली आहे. आता तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची हार्डकॉपी (hardcopy) सोबत ठेवणे जास्त गरजेचे नाही, माहित करून घ्या डिजीलॉकर सुविधेबद्दल.

What is DigiLocker?: डिजिटल लॉकर (Digital Locker) जुलै 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी लॉन्च (launch) केले होते. डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत डिजीलॉकर लाँच करण्यात आले. डिजीलॉकर खाते ओपन करण्यासाठी  तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. देशातील नागरिक कोणतेही सरकारी प्रमाणपत्र जसे की पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट (PAN Card, Voter ID Card, Passport) इत्यादी डिजीलॉकरमध्ये ठेवू शकतात. डिजिटल लॉकर हे एक ऑनलाइन पोर्टल (Online portal) आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचे सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकता. या महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज कधी वाटली तर ते सोबत घ्यावे लागणार नाही, फक्त तुमच्या मोबाईलच्या मदतीने तुम्ही तुमची कागदपत्रे डिजीलॉकर मधून काढून वापरू शकता.

डिजिटल लॉकर सुविधेचा उद्देश (Purpose of Digital Locker Facility)

डिजीलॉकर सुविधा देण्यामागचा केंद्र सरकारचा असा की, डॉक्युमेंट्सचे कागदी स्वरूप कमी व्हावे, त्याचबरोबर विविध क्षेत्रात डॉक्युमेंट्सची देवाणघेवाण करणे सोपे झाले पाहिजे. डॉक्युमेंट्स स्कॅन (Scan documents) करून लवकरात लवकर हवे तिथे पाठवता आले पाहिजे. 50MB चे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. तुम्ही फोल्डर तयार करूनही डॉक्युमेंट्स  अपलोड करू शकता. डिजीलॉकरची कागदपत्रे valid असतील असे केंद्रीय परिवहन विभागाने वाहतूक पोलिसांना सांगितले आहे. भारतीय रेल्वेने सुद्धा  डिजिलॉकरच्या कागदपत्रांना valid मानले आहे.

  • सर्वात आधी तुम्हाला डिजी लॉकरच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.  
  • त्यानंतर साइन अप या पर्यायावर वर क्लिक करा.
  • एक नवीन पेज ओपन होईल  जिथे तुमचा कॉनटॅक्ट नंबर (contact no) टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुम्ही दिलेला कॉनटॅक्ट नंबर वर ओटीपी येईल.
  • त्यानंतर तुमचे युजरनेम आणि पासवर्ड सेट करावा लागेल.
  • आता डिजी लॉकर तुम्हाला वापरण्यासाठी तयार आहे.

डिजीलॉकरमध्ये कागदपत्रे कशी अपलोड करायची? (How to upload documents in DigiLocker?)

  • डिजीलॉकरवर लॉगिन करा.
  • Uploaded Documents या ऑप्शनवर क्लिक करा
  • डॉक्युमेंट्सबद्दल थोडक्यात लिहा
  • त्यानंतर अपलोड बटणावर क्लिक करा.

कोणकोणते डॉक्युमेंट्स साठवू शकता? (What documents can you store?)

  • ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license)
  • मार्कशीट (mark sheet) 10वी, 12वी, पदवी
  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • पॅन कार्ड (PAN card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • सरकारी डॉक्युमेंट्स (Government Documents)

डिजी लॉकरचे फायदे (Advantages of Digi Locker)

  • हार्ड कॉपीसोबत घेऊन फिरण्याची गरज नाही. 
  • डॉक्युमेंट हरवण्याची भीती नाही. 
  • हार्ड कॉपी हरवल्यानंतर सुद्धा ऑनलाइन डॉक्युमेंट्स असतील. 
  • प्रत्येक वेळी डॉक्युमेंट सोबत असतील. 
  • वेळेवर डॉक्युमेंटचे काम असल्यास कुठेही भटकण्याची गरज नाही.
  • निशुल्क डॉक्युमेंट्स security.