Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Debit Card: डेबिट कार्ड म्हणजे काय? आणि त्याचे फायदे काय?

What is Debit Card

Debit Card: डेबिट कार्ड (Debit Card) हे पॅनकार्डच्या आकाराइतके प्लॅस्टिक मनी कार्ड (Plastic Money Card) आहे. या कार्डाच्या मदतीने रोख पैसे नसतानाही व्यवहार करता येतात. तसेच एटीएममधून पैसे काढण्यासाठीसुद्धा याचा वापर होतो.

What is Debit Card: डेबिट कार्ड हे एक असे कार्ड आहे; ज्याद्वारे रोख पैशांऐवजी व्यवहार करता येतो. आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर डेबिट कार्ड हे पैसे देण्याचा किंवा खरेदी करण्याचा एक मार्ग आहे. ग्राहक जेव्हा बॅंकेत खाते उघडतात तेव्हा बॅंकेकडून ग्राहकाच्या मागणीनुसार किंवा आता सर्वच बॅंका ग्राहकांना डेबिट कार्ड देतात. डेबिट कार्ड (Debit Card) हे पॅनकार्डच्या आकाराइतके प्लॅस्टिक मनी कार्ड (Plastic Money Card) या कार्डमध्ये एक मॅग्नेटिक चीप (Magnetic Chip) असते. त्या चीपमध्ये कार्डधारकाची माहिती जतन केलेली असते. या जतन केलेल्या माहितीच्या आधारे कार्डधारक रोख पैसे नसतानाही व्यवहार करू शकतो. काही बॅंका डेबिट कार्डची सेवा (Debit Card Service) मोफत देतात, तर काही बॅंका यासाठी शुल्क (Debit Card Fee) आकारतात.

डेबिट कार्ड हे दिसायला क्रेडिट कार्ड (Credit Card) सारखेच असते. पण याचे काम वेगळ्या पद्धतीने चालते. क्रेडिट कार्डवर कार्डधारकाला पैसे वापरण्याचे क्रेडिट मिळते. तर डेबिट कार्डचा वापर केल्यास बॅंकेतून लगेच पैसे कट होतात किंवा व्यवहार केलेल्या व्यक्तीच्या खात्यात ते पैसे जमा होतात. त्यामुळे डेबिट कार्डचा वापर करताना बॅंक खात्यात पुरेशी रक्कम असणे गरजेचे आहे.


डेबिट कार्डचे फायदे काय? Benefits of Debit Card?

  • डेबिट कार्डचा वापर करताना रोख स्वरूपात पैसे बाळगण्याची गरज पडत नाही. डेबिट कार्डचा वापर करून वस्तू विकत घेता येऊ शकते. यासाठी फक्त कार्ड स्वाईप करून पिन नंबर टाकावा लागतो.
  • डेबिट कार्डने व्यवहार केल्यावर लगेच बॅंकेतून पैसे कट होतात. त्याचा मॅसेजसुद्धा कार्डधारकाच्या मोबाईल नंबरवर येतो.
  • डेबिट कार्डचा वापर करून एटीएमद्वारे (Automated Teller Machin-ATM) कधीही पैसे काढता येतात. रोख पैसे काढण्यासाठी बॅंकेत जावे लागत नाही.
  • सध्या बऱ्याच ठिकाणी डेबिट कार्डवर खरेदी केल्यास त्यावर कॅशबॅकची ऑफर दिली जाते.


डेबिट कार्डमध्ये पिन नंबर काय असतो? What is Pin Number in Debit Card?

पिन नंबर हा डेबिट कार्डने व्यवहार करण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा नंबर आहे. हा प्रत्येक कार्डधारकाचा वैयक्तिक नंबर असतो. म्हणजे बॅंक जेव्हा डेबिट कार्ड देते, तेव्हा त्यासोबत त्याचा पिन नंबर सुद्धा देते. जो कार्डधारकाने लगेच बदलणे अपेक्षित असतो. डेबिट कार्डधारकाला या पिन क्रमांकाशिवाय व्यवहार करता येत नाही.

डेबिट कार्डचा पिन क्रमांक खूप महत्त्वाचा आहे; तो क्रमांक आणि डेबिट कार्ड इतरांच्या हातात गेले तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्याच्या खात्यातून सर्व पैसे काढून घेतले जाऊ शकतात. त्यामुळे डेबिट कार्डचा वापर खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. यासाठी तुमच्या कार्डचा पिन क्रमांक कधीची कोणाशीही शेअर करू नका. प्रत्यक्ष बॅंकेलाही शेअर करू नका. तो फक्त तुमच्यासाठीच असतो.