Rail Vikas Nigam Limited: रेल विकास निगम लिमिटेड कंपनी ही रेल्वे खात्यांतर्गत येणारी विविध विकासकामांची पूर्तता करणारी कंपनी आहे. या कंपनीची स्थापना केंद्र सरकारने कंपनी अधिनियम, 1956 अंतर्गत केली होती. ही कंपनी 87 टक्के सरकारच्या मालकीची असून या कंपनीद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा विकास केला जातो.
रेल विकास निगम लिमिटेड (Rail Vikas Nigam Limited-RVNL) हा केंद्र सरकारचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. या कंपनी इक्विटी शेअर्स इतर पीएसयू बॅंक (PSU Bank), वित्तीय संस्था किंवा इतर भागीदारांना दिले आहेत. रेल विकास निगमची भूमिका एक विकासात्मक कंपनी अशी आहे. जी रेल्वे खात्यांतर्गत येणाऱ्या विविध प्रकल्पांची अंमलबजावणी करते. तसेच देशभर चालणाऱ्या रेल्वे खात्यातील रेल्वे गाड्यांचे मॅनेजमेंट आणि देखभाल दुरूस्तीचे काम रेल विकाम निगम पाहते. भारतीय रेल्वेसाठी लागणाऱ्या इंजिनिअरिंग क्षेत्रातील मदत या कंपनीकडून पुरवली जाते. याचबरोबर ही कंपनी रेल्वेसाठी पैसे उभारण्याचे काम ही करते. पण तरीही या कंपनीसाठी बहुतांश निधी म्हणजे सुमार 96 टक्के निधी हा रेल्वेकडून येतो.
रेल विकास निगम कंपनीचा कारभार सुरळितपणे चालावा यासाठी कायद्यात्मक दृष्ट्या रेल विकास निगम लिमिटेड रेल्वे अधिनियम, 1989 अंतर्गत रेल्वे प्रशासन कार्यरत आहे. भारतीय रेल्वे खात्यांतर्गत येणारे सर्व नवीन प्रकल्प, जसे की, नवी रेल्वेलाईन टाकणे, रेल्वेरूळांचे इलेक्ट्रिफिकेशन, गेज बदलण्याचे काम आणि काही ठिकाणी मेट्रो ट्रेनच्या उभारणीसाठीही (Indian Railways Infrastructure) ही कंपनी काम करत आहे. रेल विकास निगम कंपनी राष्ट्रीय रेल विकास योजनांतर्गत विविध विस्तार योजनांवर काम करत आहे. यामध्ये रेल विकास निगम कंपनी वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी निधी उभारण्याचे काम करत आहे.
सध्या रेल विकास निगम कंपनी (Rail Vikas Nigam Limited-RVNL) रेल्वेचे जाळे विस्तारण्यावर भर देत आहे. या विस्तारित कार्यक्रमांतर्गत रेल विकास निगम दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या 4 महानगरांना एकमेकांशी जलदरीत्या जोडण्याची योजना तयार करत आहे. डिसेंबरपर्यंत सरकारने या कंपनीतील 87.84 टक्के हिस्सा स्वत:कडे ठेवला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचा शेअर्स बुधवारी (दि. 28 डिसेंबर) 65.25 रुपयांवर खुला (Rail Vikas Nigam Limited Share Price) झाला. तो आता 66.70 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. 52 आठवड्यातील याचा निचांकी स्तर 26.35 रुपये तर 52 आठवड्यातील उच्चांकी किंमत 84.15 रुपये होती.