Top used trading app: ट्रेडिंग अॅप हे मोबाइल अॅप आहे जे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याची सुविधा शेअर मार्केट ट्रेडर्सना देतात. या व्यतिरिक्त, या अॅप्सद्वारे, बाजारातील ताज्या घडामोडी, बातम्या, संशोधन अहवाल, विविध सेक्टरमधील शेअर्सची माहिती, तज्ज्ञांचे सल्ले तसेच आयपीओ (IPO), म्युच्युअल फंड्स, कमॉडिटी यामधील गुंतवणुकीबाबत सल्ले, आदी बाबी त्यांच्या अॅप आणि वेबसाईटवरुन उपलब्धस करतात.
ट्रेडिंग अॅप्स हे ट्रेडर्सची रिअल-टाइम प्रोसेसिंग दाखवतात. मुख्य म्हणजे ट्रेडर्सच्या शेअर्सच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यात मदत करतात. सध्या वेबसाईटपेक्षा अॅप्स वापरण्याकडे कल अधिक आहे, कारण मोबाईल सतत चोवीस ताससोबत असतो. तर, विश्वासार्ह अॅपसह कधीही, कुठेही शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतात. मोकळ्या वेळेत शेअर बाजारावर लक्ष ठेवता येते किंवा घडामोडींची माहिती घेता येते, यामुळे अॅप वापरण्याकडे कल वाढला आहे.
सर्वाधिक वापरले गेलेले टॉप 3 अॅप्स (Top 3 Most Used Trading Platforms)
- जेरोधा काईट (Zerodha kite): हे भारतातील सर्वात मोठे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म मानले जाते. या अॅपवर 40 लाख युजर अॅक्टीव्ह आहेत. याचा भारतीय स्टॉक एक्स्चेंजवरील दैनिक व्यापारातील 15 टक्क्यांहून अधिकचा हिस्सा आहे. या प्लॅटफॉर्मची सुरुवात 2010 साली झाली होती. याच कंपनीने भारतीय इक्विटी मार्केटमध्ये सवलत ब्रोकरेजची संकल्पना लोकप्रिय केली. ज्यामध्ये गुंतवणूकदारांसाठी ब्रोकरेज मॉडेल नाही, अर्थात येथे झीरो ब्रोकरेज आहे. या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र सोय आहे, ज्यामुळे ग्राहकांना हे अॅप सोयीस्कर वाटते.
- अपस्टॉक्स (Upstox): अपस्टॉक्स हा वेगाने वाढणारा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मला कलारी कॅपिटल, रतन टाटा, जीव्हीके डेविक्स इत्यादींसह आघाडीच्या गुंतवणूकदारांचा पाठिंबा आहे. यामुळेच या प्लॅटफॉर्मवर ट्रेडर्सचा खूप विश्वास आहे. अपस्टॉक्सची सुरुवात 2012 साली होती. अपस्टॉक्स इक्विटी डिलिव्हरी व्यवहार विनामूल्य होतो. बीएसई (BSE), एनएसई (NSE), एमसीएक्स (MCX) आणि इंट्राडे ट्रेडिंगवर प्रति ऑर्डर 20 रुपये शुल्क आकारतात.
- एंजल ब्रोकिंग (Angel Broking): ट्रेडिंगमधील सर्वात जुन्या प्लॅटफॉर्मपैकी एक एंजल ब्रोकिंग आहे. या प्लॅटफॉर्मचे 10 लाख अॅक्टीव्ह युजर्स आहेत. अठराशेहून अधिक शहरांमध्ये यांचे कार्यालय आहे. हे बीएसई (BSE), एनएसई (NSE), एनसीडीईएक्स (NCDEX) आणि एमसीएक्स (MCX)वर इक्विटी, कमोडिटीज आणि चलनांमध्ये ट्रेडिंग सुविधा देते. या प्लॅटफॉर्मवर कमी दरात सेवा दिल्या जातात. हे सर्वात जुने आणि विश्वासार्ह असल्यामुळे ऑनलाईनवरही ट्रेडर्स या प्लॅटफॉर्मवरुन ट्रेडिंग करण्याकडे कल देतात. तसेच येथे बाजार तज्ज्ञांशी थेट संपर्क साधून सल्ले घेता येतात, हे त्यांचे युनिक फीचर आहे.
या टॉप 3 ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसह, एचडीएफसी सिक्युरीटीज, आयसीआयसीआय डायरेक्ट, शेयरखान, मोतीलाल ओसवाल हे देखील सर्वाधिक वापरले गेलेले प्लॅटफॉर्मस् आहेत. ही माहिती स्टॅटेस्टीकाच्या भारतीय शेअर मार्केटवरील वार्षिक अहवालात नमूद केलेले आहे.