भारतीय बाजारपेठेत सूचीबद्ध असलेली, अनिल अंबानींची ही कंपनी रिलायन्स ADG या कंपनीचा भाग आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (National Stock Exchange) रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्सने इंट्राडे उच्चांक 10.65 गाठला होता. आजही हे शेयर्स अप्पर सर्किटमध्ये आहे. गेल्या तीन दिवसांबद्दल बोलायचे झाले तर या शेअरमध्ये 15 टक्क्यांपर्यंत उसळी होती.
कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेत असतानाही शेयर्समध्ये उसळी!
आजकाल रिलायन्स कॅपिटल विक्री प्रक्रियेमुळे वादात सापडली आहे. तही कंपनि दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून आहे. रिलायन्स कॅपिटलसाठी गेली ५ वर्षे अत्यंत वाईट गेली आहेत. या काळात शेअर्स 98 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. रिलायन्स कॅपिटलचे शेअर्स 600 रुपयांवरून 10.10 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
कंपनीचा वाद कोर्टात!
रिलायन्स कॅपिटलच्या विक्रीचे प्रकरण एनसीएलटी (National Company Law Tribunal) न्यायालयात सुरू आहे. कारण हिंदुजा ग्लोबल आणि टोरेंट ग्रुपने रिलायन्स कॅपिटलच्या संपादनासाठी 21 डिसेंबर रोजी ई-लिलावात भाग घेतला होता. या प्रस्तावित अधिग्रहणासाठी टोरेंट समूहाने लिलावात 8640 कोटी रुपयांची बोली लावली होती. लिलावात ही कंपनी अव्वल क्रमांकावर होती. त्यानंतर दोन दिवसांनंतर हिंदुजा ग्लोबलने 9000 कोटी रुपयांची सुधारित बोली लावली होती.
एनसीएलटीने (NCLT) या खटल्याच्या सुनावणीदरम्यान टोरेंट समूहाला दिलासा देताना हिंदुजा ग्लोबल आणि रिलायन्स कॅपिटलच्या नवीन प्रस्तावाला मंजुरी देणे थांबवण्याचे आदेश दिले. एनसीएलटी पुढील आठवड्यात त्यावर सुनावणी करणार आहे. रिलायन्स कॅपिटलने कोणाची बोली स्वीकारायची याचा अंतिम निर्णय NCLT घेईल.
शेअर्समध्ये तेजी का आहे
रिलायन्स कॅपिटलच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारणही तज्ज्ञांनी दिले आहे. तज्ञांनी स्पष्ट केले की, नवीन आर्थिक वर्षात रिलायन्स कॅपिटलच्या समभागांवर मार्केट नव्या पद्धतीने विचार करत आहेत. नवीन व्यवस्थापन आल्यास कंपनीत आर्थिक बदल होऊ शकते असे गुंतवणूकदारांना वाटते आहे. एनसीएलटीचा निर्णय काहीही असो, बाजाराला आशा आहे की मार्केटमध्ये होणारे हे परिणाम रिलायन्स कॅपिटलच्या आर्थिक आणि कॉर्पोरेट व्यवस्थापनासाठी फायदेशीर ठरतील.