Vi Recharge Offer: सध्या सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन(Telecom Company Recharge Plan) महाग झाले आहेत. इतर टेलिकॉम कंपन्याप्रमाणे Vodafone Idea चे देखील वापरकर्ते खूप आहेत. ही कंपनी ग्राहकांचा आर्थिक भार लक्षात घेता त्यांना परवडणारे प्लॅन नेहमीच लाँच करत असते. Vodafone Idea मोफत डेटा(Free data) देत आहे याबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? पण यासाठी एक अट आहे. नेमकी कोणती आहे ही अट(Condition), चला याबद्दल जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
कधी वापरता येईल डेटा?
Vodafone Idea ही एकमेव अशी कंपनी आहे जी वीकेंड डेटा रोलओव्हर(Weekend data rollover) करते. त्यामुळे ग्राहकांना आता रात्रभर मोफत अनलिमिटेड इंटरनेट(Free Unlimited Internet) वापरता येणार आहे. परंतु, हा डेटा तुम्हाला रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंतच वापरता येणार आहे. Vi Hero Unlimited सेवेसह, कंपनी आपल्या सर्व वापरकर्त्यांना रात्रभर मोफत अनलिमिटेड इंटरनेट सेवा देत आहे. त्यासोबतच हा डेटा दैनिक मर्यादेत समाविष्ट केलेला नाही त्यामुळे या कालावधीत इंटरनेट वापरताना दैनंदिन डेटा मर्यादा संपणार नाही. याचा फायदा उचलून ग्राहक बिनधास्त डेटा वापरू शकतात.
नक्की ऑफर काय?
Vodafone Idea Hero अनलिमिटेड सुविधेचा लाभ सर्व प्रीपेड प्लॅन्सवर(Prepaid Plan) 299 रुपये आणि त्यावरील प्लॅनवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तुम्ही आता 299 रुपयांवरील कोणत्याही प्लॅनमधून रिचार्ज केला तर वापरकर्त्यांना मोफत 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अमर्यादित डेटा मिळणार आहे.
या प्लॅनसह करा रिचार्ज
जर तुम्ही 299 रुपये ते 3,099 रुपयांपर्यंतचा रिचार्ज केला तर या ऑफरचा लाभ तुम्हाला सहज घेता येणार आहे. तुमच्या प्लॅनची वैधता आणि दैनंदिन डेटा लिमिट काहीही असो, या ऑफरचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे.
वीकेंड डेटा रोलओव्हर(Weekend data rollover)
Vodafone Idea ही प्रीपेड प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर सुविधा देणारी एकमेव कंपनी असून तुम्ही तुमचा दैनंदिन डेटा सोमवार ते शुक्रवार दरम्यान वाचवला असेल तर तो डेटा वीकेंडला म्हणजे शनिवार आणि रविवारी तुम्हाला वापरता येणार आहे.