Vodafone Idea New Prepaid Plans: हल्ली मोबाईलचा रिचार्ज प्लॅन(Mobile Recharge Plan) अतिशय महाग झाला आहे. त्यामुळेच खासगी टेलिकॉम कंपनी(Telecom Company) Vodafone Idea (Vi) ने एअरटेल(Airtel) आणि जिओला(Jio) तोडीस तोड टक्कर देण्यासाठी दोन स्वस्तातले प्लॅन्स(Cheap Plans) ग्राहकांसाठी लाँच केले आहेत. या प्लॅन्ससाठी ग्राहकांना फक्त 25 रुपये आणि 55 रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लॅन्समध्ये तुम्हाला अॅड-फ्री म्यूझिकचा अॅक्सेस मिळत असून Vi ने Hungama Music भागीदारी केली असल्याने यूजर्सला प्लॅन अंतर्गत मोफत म्यूझिकचा फायदा मिळणार आहे.
हे दोन्ही प्लॅन 4G डेटा वाउचर असून या प्लॅन्सचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे वोडाफोन आयडियाचा अॅक्टिव्ह बेस प्लॅन(Active Base Plan) असणे आवश्यक आहे. चला तर या 25 आणि 55 रुपयाच्या यास्वस्त प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Vodafone Idea चा 25 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
Vodafone Idea ने यूजर्ससाठी फक्त 25 रुपयांचा डेटा वाउचर प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1.1जीबी हाय-स्पीड 4G डेटा दिला जात आहे. या डेटाचा फायदा ग्राहक 24 तास घेऊ शकतात. तसेच, 7 दिवसांसाठी अॅड-फ्री म्यूझिक(Add Free Music) देखील मिळणार आहे. तुम्हाला जर अॅड-फ्री म्यूझिक नको असल्यास 19 रुपयांचा 4G डेटा वाउचर देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्लॅनची वैधता केवळ 1 दिवस असणार आहे.
Vodafone Idea 4G चा 55 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
ग्राहकांसाठी 55 रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील लाँच करण्यात आला आहे. वोडाफोन आयडियाच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 3.3 जीबी 4G हाय-स्पीड डेटाचा फायदा मिळेल. या प्लॅनची वैधता 7 दिवस असणार आहे. यामध्ये देखील अॅड-फ्री म्यूझिकची(Add Free Music) सुविधा मिळणार आहे. महिनाभर अॅड-फ्री म्यूझिकचा फायदा ग्राहक घेऊ शकतात.
वोडाफोन आयडियाकडे 75 रुपयांचा प्लॅन देखील उपलब्ध आहे. 7 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये 6GB हाय-स्पीड डेटा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र या प्लॅन्सचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांकडे अॅक्टिव्ह बेसिक रिचार्ज प्लॅन(Active Base Recharge Plan) असणे आवश्यक आहे तरच याचा आनंद लुटता येईल.