Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vodafone Idea कंपनी पुन्हा अडचणीत, बँकांचा कर्जाला नकार

Vodafone Idea

Image Source : www.mobileworldlive.com

Vodafone Idea ही टेलिकॉम सेवा पुरवणारी कंपनी पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. काही स्थानिक बँकांकडे कंपनीने 70 अब्ज रुपयांच्या कर्जाची मागणी केली आहे. पण, बँका कर्ज पुरवठ्यासाठी तयार नाहीएत. का ते बघूया…

व्होडाफोन - आयडिया (Vodafone - Idea) ही टेलिकॉम सेवा (Telecom Service) पुरवणारी कंपनी मागची काही वर्ष आर्थिक अडचणीत आहे. आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कंपनीने देशांतर्गत बँकांकडून 70 अब्ज रुपयांचा आप्तकालीन निधी म्हणजेच कर्ज मागितलं होतं. पण, व्होडाफोन आयडियाला नवी कर्जं देण्यासाठी भारतीय बँका उत्सुक नसल्याचं दिसतंय.    

कंपनीने आपल्या भाग भांडवलदारांकडून आधी निधी जमा करावा. आणि मग उरलेल्या निधीसाठी बँका मदत करतील अशी बँकांची मानसिकता आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं या विषयीची बातमी दिली आहे. व्होडोफोन ही युकेमधली दूरसंचार कंपनी आहे. तर आयडिया ही आदित्य बिर्ला या भारतीय समुहाची कंपनी आहे. दोन वर्षांपूर्वी या दोन कंपन्यांचं विलिनीकरण होऊन व्होडफोन - आयडिया कंपनी तयार झाली. पण, तेव्हापासून कंपनीच्या आर्थिक अडचणी संपलेल्या नाहीत.    

फायनान्शिअल एक्सप्रेस वृत्तपत्रानेही व्होडाफोन - आयडिया कंपनीला दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी 3 अब्ज रुपयांची तातडीची मदत हवी असल्याचं म्हटलंय. ‘त्याशिवाय कंपनी चालूच शकणार नाही,’ असं या बातमीत म्हटलंय. या तातडीच्या मदतीसाठी व्होडाफोन आयडिया कंपनी एकतर सरकारी मदतीकडे डोळे लावून बसलीय. नाहीतर बँकांकडे त्यांनी आपत्कालीन निधीतून पैसा उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केलीय.    

पण, बँका आणि सरकार दोघांचं म्हणणं असं आहे की, कंपनीने समभागधारकांकडून पैसे घ्यावे. दूरसंचार कंपनीला लायसन्स फीच्या स्वरुपात काही पैसे सरकारकडे भरावे लागतात. आणि कंपनीची ही थकबाकी वाढत चालली आहे. या थकित रकमेच्या व्याजापोटी आता कंपनीला 1 अब्जाच्या वर पैसे भरायचे आहेत. समभागांच्या स्वरुपात ही परतफेड करण्याची तयारी कंपनीने दाखवली आहे.    

बँकांचंही तेच म्हणणं आहे. आधी कंपनीने समभाग विक्रीतून पैसा उभारावा. उरलेला पैसा देण्यावर बँका विचार करायला तयार आहेत. व्होडाफोन - आयडिया कंपनीवर सध्या 26 अब्ज अमेरिकन डॉलरच्या वर कर्ज आहे.    

समभाग नावावर करण्याची कंपनीची विनंती केंद्रसरकारने मान्य केली तर व्होडाफोन - आयडिया कंपनीची 30% हिस्सेदारी सरकारकडे जाईल.