इंडस टॉवर्स कंपनीने व्होडाफोन-आयडिया (Vi) या मोबाईल नेटवर्क कंपनीला थकबाकी भरण्याचे आवाहन करत नोव्हेंबरपासून त्यांचा टॉवर वापरण्यास देणार नसल्याचा इशारा दिला. व्होडाफोन-आयडिया कंपनी टॉवर कंपन्यांजे 10 हजार कोटी रुपये देणं आहे. त्यातील 7 हजार कोटी रुपये इंडस टॉवर कंपनीला देणं अपेक्षित आहे. इंड्स कंपनीने व्होडाफोन-आयडियाचा टॉवर अॅक्सेस ब्लॉक केल्यास Vi च्या 25.5 कोटींहून जास्त ग्राहकांची मोबाईल सेवा विस्कळीत होऊ शकते, असे इकॉनॉमिक्स टाईम्सने म्हटले.
Table of contents [Show]
10 हजार कोटींहून अधिक रक्कम थकित!
टॉवर कंपनीने व्होडाफोन-आयडियाला पाठवलेल्या पत्रात सज्जड दम दिला असल्याचे म्हटले जाते. या पत्रात, इंडस टॉवर्सने व्होडाफोन-आयडिला कंपनीला त्यांच्या थकबाकीतील 80 टक्के रक्कम त्वरित भरण्यास सांगितले आहे. तसेच प्रत्येक महिन्याची संपूर्ण रक्कम वेळेत भरण्याचा इशारादेखील देण्यात आला. व्होडाफोन-आयडियाची 10 हजार कोटींहून अधिक रक्कम थकित आहे. इंड्स कंपनीचे 7 हजार कोटी आणि अमेरिकन टॉवर कंपनीचे 3 हजार कोटी रुपये देणं बाकी आहे.
ऑक्टोबरपर्यंत थकबाकी जमा करण्याचा इशारा!
इंड्स कंपनीच्य बोर्डाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत कंपनीच्या जमा-खर्चावर आणि एकूणच ताळेबंदावर चर्चा झाली. यावेळी व्होडाफोन-आयडिया या कंपनीकडे 7 हजार कोटींची थकबाकी असल्याचे समोर आले. याबाबत इंड्स कंपनीने Vi कंपनीला सोमवारी (दि. 26 सप्टेंबर) खरमरीत पत्र पाठवून थकित रक्कम ऑक्टोबरपर्यंत भरण्याचे सांगितले. अन्यथा नोव्हेंबरपासून टॉवर वापरण्यास दिला जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
व्होडाफोन-आयडिया देशातील तिसरी मोठी कंपनी!
रिलायन्स जिओ आणि एअरटेलनंतर व्होडाफोन-आयडिया ही देशातील तिसरी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे 25.5 कोटी ग्राहक भारतात आहेत. त्यात रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपनीने दिवळीत 5G नेटवर्क लॉन्च करणार असल्याचे सांगितले. त्यात व्होडाफोनला सध्याचे नेटवर्क सांभाळण्यात अडचणी येत असल्याने व्होडोफोनने अद्याप 5G बद्दल काहीच घोषणा केलेली नाही. त्यामुळे व्होडाफोन ग्राहकांना 5G नेटवर्क मिळवण्यासाठी किती दिवस प्रतिक्षा करावी लागणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Vodafone-Idea युके बेस कंपनी!
व्होडाफोन ही युके बेस कंपनी Vodafone Group Plc. चा भाग होती. तिने आदित्य बिर्ला ग्रुपच्या आयडिया कंपनीसोबत टायअप करून व्होडाफोन-आयडिया अशी नेटवर्क सेवा सुरू केली. या दोन्ही कंपन्या एकत्र येऊनही कंपनीवरील कर्ज कमी होऊ शकलेले नाही. कंपनीचे थकित कर्ज 10 हजार कोटींच्या पुढे गेले. दरम्यान, कंपनी कर्ज आणि इक्विटीच्या माध्यमातून 20 हजार कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करत आहे. पण कंपनीला त्यात अजून यश मिळालेले नाही.